Exclusive

MSRTC News : कोकणात एसटीच्या ३१०० बसेस धावणार ! जेष्ठ नागरिकांना १०० टक्के,महिलांना ५० टक्‍के तिकीट दरात सवलत

MSRTC News :- १९ सप्टेबर रोजी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र हा उत्सव दरवर्षी मोठ्या थाटात साजरी करण्यात येत असल्याने गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेसह एसटी महामंडळाकडून देखील जादा बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे.

कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान ३१०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी सोमवार १४ ऑगस्टपर्यंत १७०० बसेसचे गट आरक्षण पूर्ण झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

दरम्यान, १४ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सव सर्वत्र थाटात साजरा केला जातो, अशातच गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे.

त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी रेल्वे, एसटी बसेसचे जादाची सेवा प्रशासनाकडून करण्यात येते. यंदादेखील एसटी महामंडळाकडून सुमारे ३९०० जादा गाड्या कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी बाहनदुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.दरम्यान, गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्‍के तिकीट दरात सवलत दिली जात आहे.

आरक्षण कसे कराल?
बसेस आरक्षणासाठी अधिकृत संकेतस्थळावर (https://msrtc.maharashtra.gov.in/) सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या अँपद्वारे, तसेच खासगी बुकिंग एजंट व त्यांच्या अँपपवर उपलब्ध होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: MSRTC News

Recent Posts