Mumbai Coastal Road : मुंबईकरांसाठी एक अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील आणि उपनगरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे.
यामध्ये मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या कोस्टल रोड प्रकल्पाची संकल्पना गेल्या महाविकास आघाडी सरकारने ठेवली होती. हा प्रकल्प माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक आहे.
यामुळे गेल्या महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते. वर्तमान शिंदे फडणवीस सरकारने देखील या प्रकल्पाला गती देण्याचे काम केले आहे.
अशातच या प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोस्टल रोडचा वरळी ते मरीन ड्राईव्ह हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 अखेर प्रवाशांसाठी खुला होणार आहे.
या कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करून डिसेंबर 2023 पर्यंत हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पहिला टप्पा जरी डिसेंबर 2023 मध्ये प्रवाशांसाठी खुला होणार असला तरी देखील या संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी जून 2024 पर्यंत मुंबईकरांना वाट पहावी लागणार आहे.
म्हणजेच जून 2024 पर्यंत संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर मग हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे चित्र आहे.
हे पण वाचा :- आज अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह ‘त्या’ 13 जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाची माहिती
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पांतर्गत, प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किमीचा रोड विकसित केला जात आहे. या प्रकल्पात 2 किमीचे दोन महाकाय बोगदे देखील तयार केले जात आहेत.
यामध्ये एका बोगद्याचे काम 10 जानेवारी 2022 ला पूर्ण झाले आहे, तर दुसऱया बोगद्याचे काम 9 एप्रिल 2022 रोजी सुरू झाले असून 99 टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे.अर्थातच हे देखील काम आता अंतिम टप्प्यात आले असून पुढील आठवडय़ात हे काम पूर्ण होणार आहे. एकंदरीत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने आता डिसेंबर महिन्यापासून पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
यामध्ये वरळी दूध डेअरीजवळील खान अब्दुल गफार खान मार्गाकडून थेट मरीन ड्राईव्हपर्यंत पहिला टप्पा खुला करण्यात येणार आहे. हा वाहतूक मार्ग दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही दिशांनी खुला होणार आहे. निश्चितच या मार्गामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.
हे पण वाचा :- पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आजपासून सुरु होणार ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन, संपूर्ण रूट, थांबे, टायमिंगबाबत वाचा…