Mumbai Goa Vande Bharat Express New Halt : सध्या राज्यात मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. कोकणातील रेल्वे प्रवासी या एक्सप्रेस ट्रेनसाठी विशेष उत्सुक आहेत. या मार्गावर ही हॉस्पिटल केव्हा सुरू होणार आहे याकडेच कोकणातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.
या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन ला 3 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा दाखवणार आहेत. तसेच ही ट्रेन पाच जून पासून नियमित प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे.
हे पण वाचा :- विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 10वी चा निकाल, कुठ पाहणार रिजल्ट?
निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या ट्रेनची आतुरता होती ती आता पुढल्या महिन्यात सुरू होणार आहे, यामुळे मुंबईमधील चाकरमान्यांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या वंदे भारत ट्रेनला या मार्गावरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकाचा देखील समावेश आहे. खरंतर खेड रेल्वे स्थानकावर मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन ला थांबा मिळावा यासाठी जल फाउंडेशन आणि कोकण विकास समितीच्या माध्यमातून मोठा पाठपुरावा करण्यात आला होता.
आता या पाठपुराव्याला यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता खेड रेल्वे स्थानकावर देखील थांबा घेणार आहे.
हे पण वाचा :- कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायच का? मग ‘ही’ कागदपत्रे जोडा अन ‘इथ’ करा अर्ज, फक्त 8 दिवसांत मिळणार प्रमाणपत्र
यामुळे येथील प्रवाशांच्या माध्यमातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी आणि खेड रेल्वे स्थानकावर ही हायस्पीड ट्रेन थांबणार असल्याने या परिसरातील रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे खेडवासियांचा तसेच परिसरातील प्रवाशांचा मुंबईकडीला आणि गोव्याकडील प्रवास सोयीचा होणार आहे.
मुंबई गोवा मध्ये भारत एक्सप्रेसला कुठे राहणार थांबे?
ही हायस्पीड ट्रेन कोकण रेल्वे मार्गावरील ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी आणि कुडाळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच ही ट्रेन दादरला थांबणार नसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘त्या’ 37 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, राज्य शासनाचा जीआर जारी; केव्हा होणार गणवेश वाटप?