Exclusive

मोठी बातमी ! नांदेडलाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा; कोणत्या मार्गावर धावणार? पहा….

Nanded Vande Bharat Express : गुरुवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालना येथे आले होते. शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील 150 फूट उंच राष्ट्रीय ध्वज व रेल्वे इंजिन लोकोमोटिव्ह बसवण्याच्या कामाच्या भूमिपूजनासाठी दानवे यांनी जालन्यात हजेरी लावली होती.यावेळी दानवे यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

दानवे यांनी नांदेड ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची घोषणा यावेळी केली आहे. खरं पाहता, सध्या महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेस बाबत विशेष चर्चा पहावयास मिळत आहेत. विशेषता जेव्हापासून मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस ची घोषणा झाली आहे तेव्हापासून या ट्रेनच्या विशेष चर्चा रंगल्या आहेत.

हे पण वाचा :- ब्रेकिंग : मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक जाहीर ! मध्य रेल्वेने काढले महत्त्वाचे परिपत्रक, वाचा…

दरम्यान उद्या अर्थात तीन जूनला मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. या ट्रेनला दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा बावटा दाखवणार आहेत. अशातच आता रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. निश्चितच मंत्री महोदय यांनी केलेल्या या घोषणेनंतर मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या भूवया उंचावल्या आहेत.

दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास 1250 रेल्वे स्टेशनचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि जालना रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी टेंडर काढले असून एका कंपनीला टेंडर देण्यात आले आहे.

हे पण वाचा :- द्राक्षे बागायतदारांची चिंता वाढवणारी बातमी; बेदाण्याच्या दरात झाली मोठी घसरण ! मिळतोय मात्र ‘इतका’ दर,  कारण काय?

पण यासाठीच्या नियमांचे आणि अटींची पूर्तता करण्याचे काम सध्या स्थितीला सुरू आहे. मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे जालना रेल्वे स्थानकासाठी 250 कोटी आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आता या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून ऑगस्ट 2023 पर्यंत 75 महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई-नांदेड या रेल्वे मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू होणार असल्याचे चित्र आहे. 

हे पण वाचा :- खरीपात तुरीच्या ‘या’ वाणाची पेरणी करा; 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार !

Ajay Patil

Recent Posts