Exclusive

दादा, मला पशुवैद्यकीय दवाखाना हवाच ! आ. निलेश लंके यांची मागणी अन लगेच अजित पवारांचे प्रस्तावाबाबत आदेश

Ahmednagar News : आ. निलेश लंके व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे किती सख्य आहे हे सर्वश्रुत आहे. दादा कधीच लंके यांचा शब्द खाली पडू देत नाहीत. मागील काही आलेल्या निधीवरून हे सर्वांच्या लक्षात आलेच आहे. दरम्यान आता आ. निलेश लंके यांनी हिवाळी अधिवेशनदरम्यान उपमुख्यंमत्री अजित पवार यांची भेट घेतली.

मतदार संघातील निमगांव वाघा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची मागणी केली. विशेष म्हणजे पवार यांनी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांना दालनात बोलवून घेत निमगांव वाघा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रस्ताव तयार करून तो आपणाकडे सादर करण्याचे आदेश दिले.

आ. निलेश लंके यांनी नागपूर येथेे हिवाळी अधिवेशना दरम्यान सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत निमगांव वाघा येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले. येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय नसल्याने आजारी जनावरांवर उपचार करण्यात अनंत अडचणी निर्माण होत आहेत.

निमगांव वाघा व परिसर हा जिरायत भाग असून शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायावरच अवलंबून राहावे लागते. येथे दुग्ध व्यवसाय मोठया प्रमाणावर करण्यात येत असल्याने या भागात जनावरांवरील उपचारासाठी पुशुवैद्यकीय दवाखान्याची अत्यंत आवश्यता आहे.

अलिकडेच झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे शेतकरी हैराण झालेला आहे. शेतीपुरक असलेल्या दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे येतात. या सर्वबाबींचा विचार करून निमगांव वाघा येथे तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यास परवानगी देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली होती.

मंजुरीसह निधीही देण्यासह ग्वाही

आ. लंके यांनी मांडलेला प्रस्ताव योग्य असल्याचे पवार यांनी सांगत प्रस्ताव प्राप्त होताच या दवाखान्यासाठी मी खास म्हणून मंजूरी देऊन निधीही देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित दादांनी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांना दालनात बोलवून घेत निमगांव वाघा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रस्ताव तयार करण्याचेही लगेच सांगितले. मुंडे यांनीही सबंधितांना प्रस्तावाबाबत सूचना देण्याचे मान्य केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts