गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करतात. शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बरेच जण एफडीच्या स्वरूपामध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूक करताना मात्र केलेली गुंतवणूक सुरक्षित आणि मिळणारा परतावा चांगला राहावा हा गुंतवणूक करण्यामागे उद्देश असतो
. या अनुषंगाने आपण विचार केला तर बरेच जण रिअल इस्टेट मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्यासोबतच सोन्यातील गुंतवणूक देखील खूप फायद्याची असते.सध्या सोन्या आणि चांदीचे जे काही दर आहेत त्या दरात येणाऱ्या दोन वर्षांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे केलेली गुंतवणूक खूप फायद्याची ठरू शकते. असे या क्षेत्रातील गुंतवणूक तज्ञांचे मत आहे.
सध्या सोन्याच्या दराची स्थिती
आपण साधारणपणे 14 ऑगस्ट म्हणजे सोमवारचा विचार केला तर या दिवशी सराफा बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झालेली होती. जर आपण या बाबतीत इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळाचा विचार केला तर त्यानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 131 रुपयांनी घसरला होता व तो 58 हजार 874 प्रति दहा ग्रॅम असा झाला होता. त्याचवेळी 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 53929 प्रति दहा ग्रॅम रुपयांवर आला आहे. आपण कॅरेट निहाय सोन्याचा प्रती 10 ग्रामचा भाव पाहिला तर तो 24 कॅरेट 58874, 22 कॅरेट 53929 आणि 18 कॅरेट 44156 प्रति दहा ग्राम अशा पद्धतीने होता.
चांदीचे दर
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या संकेतस्थळाचा विचार केला तर चांदीच्या किमतीत देखील काल मोठी घसरण झालेली होती. चांदी तब्बल 161 रुपयांनी घसरून 69 हजार 936 रुपये प्रति किलो झाली होती व शुक्रवारी 70098 होते.
सोने देऊ शकते दोन वर्षात 27% परतावा
जर आपण या मध्ये तज्ञांचा विचार केला तर केडिया ऍडव्हासरीचे संचालक अजय केडिया यांच्या मतानुसार काही महिन्यांच्या दिलाशा नंतर महागाईत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली असून हे कमी करण्याकरिता अमेरिका आणि युरोप मध्ये व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तसेच सर्व विक्रमी उच्चांक मोडल्यानंतर शेअर बाजार नफा वसुलीच्या दबावाखाली असल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी एक चांगला स्कोप तयार होत असून येणाऱ्या दोन वर्षात 27% पेक्षा जास्त परतावा सोने देऊ शकते. जर आपण यावर्षी सोन्याच्या दराचा विचार केला तर ते यावर्षी 65 हजार तर जून 2025 पर्यंत ते 75 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे जर सोन्यात गुंतवणूक केली तर येणाऱ्या दोन वर्षात 27 टक्के परतावा सोने देऊ शकते.