Exclusive

मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा,फेरफार आणि खाते उतारे! असा करा मोबाईलचा वापर

जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. ज्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो अशा जमिनीच्या बाबतीत आपल्याला संपूर्ण माहिती असणे तितकेच गरजेचे असते. कारण बऱ्याचदा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये बऱ्याच कारणांनी फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे सदर जमिनीची संपूर्ण माहिती किंवा इतिहास आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे व त्याकरिता आपल्याला त्या जमिनीचे फेरफार उतारे तसेच सातबारा उतारे यांची आवश्यकता भासते.

आता एखाद्या जमिनीचा सातबारा उतारा काढायचा म्हटल्यावर आपण तो चालू स्थितीतला उतारा काढतो. परंतु तुम्हाला अगदी काही वर्षांपूर्वीचे सदर जमिनीचे रेकॉर्ड पाहिजे असेल तर त्याकरिता तुम्हाला त्या त्या वर्षाचे सातबारे उताऱ्यांची आवश्यकता भासते. त्यामुळे साहजिकच मनात प्रश्न उद्भवतो की जमिनीचे जुने रेकॉर्ड कुठे पाहावे किंवा कोणत्या ठिकाणी आपल्याला मिळेल.

परंतु आता याबाबतीत काळजी करण्याची गरज नसून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या हातातील मोबाईलच्या माध्यमातून अगदी घरी आरामात बसून तब्बल 1880 सालापासून संबंधितचे सातबारा उताऱ्यांपासून फेरफार देखील पाहू शकता.

 1880 सालापासून पाहता येतील जमिनीचे सातबारा, फेरफार खाते उतारे

सध्या महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने त्यांच्या अनेक सेवा या आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केल्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सातबारे उतारे किंवा फेरफार उतारे देखील पाहता येतात. तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॅम्पुटर च्या माध्यमातून ही कागदपत्रे पाहू शकतात. त्याआधी सर्वप्रथम तुम्हाला….

 संबंधित संकेतस्थळावर तुमची नोंदणी करणे गरजेचे आहे

1- याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर गुगल वर जाऊन aapleabhilekh.mahabhumi.gov.in हे संकेतस्थळ टाईप करून सर्च करावे लागेल.

2- त्यानंतर हे संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ई रेकॉर्ड्स तुम्हाला या संकेतस्थळाच्या पहिल्या पेजवरच दिसते व त्यावर क्लिक करणे गरजेचे आहे.

3- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नेक्स्ट विंडो ओपन होते व तुम्हाला यासाठी भाषा निवडण्याकरिता पर्याय दिसतो व तुम्ही भाषेची निवड केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करता येते.

4- तुम्ही या साइटवर नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात आधी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी तुम्हाला या ठिकाणी वापरकर्ता नोंदणी या पर्यावर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फार्म ओपन होतो व या फॉर्ममध्ये तुम्हाला आवश्यक ती माहिती भरून म्हणजे जशी की तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव आणि आडनाव, असेच तुमची नॅशनॅलिटी आणि मोबाईल नंबर टाकावा लागतो.

मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसायाची निवड करायची आहे किंवा तुम्ही जो काही व्यवसाय किंवा नोकरी करीत असाल तो तुम्हाला निवडणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला खाली मेल आयडी, तुमची जन्मतारीख टाकावी लागते आणि शेवटी संपूर्ण पत्ता लिहून  आवश्यक माहिती भरून तो रकाना तुम्हाला संपूर्ण भरणे गरजेचे आहे. तुमचा एरिया चा पिनकोड टाकला की त्या ठिकाणी जिल्हा आणि राज्य आपोआप येते.

सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी तयार करावा लागतो. त्यानंतर लॉगिन आयडी तपासून त्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे. पासवर्ड तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी काही प्रश्न विचारले जातात व त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला बाजूला कॅप्चा कोड दिसतो व हा कोड जशाचा तसा तुम्हाला दिलेल्या चौकटीत नमूद करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर तुमची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला दिसतो.

 आता तुम्हाला संबंधित जमिनीचा सातबारा पाहण्यासाठी लॉगिन करणे गरजेचे आहे

1- तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला परत लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल व तुम्ही जो काही युजर आयडी आणि पासवर्ड तयार केला आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकणे गरजेचे आहे.

2- यामध्ये तुम्हाला सातबारा फेरफार खाते उतारा पाहायचा आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीला खाते उतारा कसा पहावा हे पाहू.

3- याकरिता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमचे तालुका, गाव आणि अभिलेखाचा प्रकार निवडायचा आहे.

4- नंतर यामध्ये जर तुम्ही फेरफार उतारा निवडला असेल तर तुम्हाला जमिनीचा गट क्रमांक टाकणे गरजेचे आहे आणि गट क्रमांक टाकल्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे.

5- या ठिकाणी 58 अभिलेखांचे प्रकार देण्यात आलेले असून तुम्हाला यापैकी जो अभिलेख पाहिजे असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

6- यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही गट क्रमांक टाकलेला आहे त्या संबंधित खाते उतारे तुम्हाला दिसतील. त्याच ठिकाणी फेरफार क्रमांक वर्ष दिलेला असतो व त्यावर तुम्ही क्लिक केले की संबंधित वर्षाचा खाते उतारा तुमच्या समोर ओपन होतो.

7- खाते उतारा तुमच्यासमोर ओपन झाल्यानंतर कार्ट मध्ये ठेवा असा पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो व त्यावर क्लिक केले की तुमच्या समोर संपूर्ण खाते उतारा ओपन होतो. खाते उतारा तुम्हाला डाऊनलोड देखील करता येतो.

वर उल्लेख केलेल्या प्रोसेस नुसार तुम्ही सातबारा उतारा देखील पाहू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही 1880 सालापासूनचे खाते उतारे, फेरफार आणि सातबारा उतारे ऑनलाइन बघू शकतात व डाउनलोड देखील करू शकतात.

Ajay Patil

Recent Posts