Exclusive

Pune-Bangalore Expressway: 55 हजार कोटी रुपयांचा आहे हा एक्सप्रेसवे! पुणे आणि बेंगलोर दरम्यानचा प्रवास होईल 7 तासात पूर्ण

Pune-Bangalore Expressway:- भारतामध्ये भारतमाला परियोजनेच्या माध्यमातून उच्च दर्जाचे आणि पायाभूत दृष्टिकोनातून तसेच ग्रीनफिल्ड  एक्सप्रेसवे उभारले जात आहेत. भारतामध्ये भारतमाला परियोजना लागू करण्याच्या मागे महत्त्वाचे कारण म्हणजे जे काही रस्त्याचे नेटवर्क सध्या भारतामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये वाढ करणे व अनेक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे आहे. या माध्यमातून अनेक दर्जेदार असे एक्सप्रेस उभारले जाणार असून देशातील सामान्य नागरिकांना प्रवास सुलभ  व्हावा तसेच औद्योगीकरण,

कृषी आणि आर्थिक क्षेत्रासाठी  म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेकरिता ही परियोजना महत्वाची आहे. याच भारतमाला परी योजनेच्या टप्पा दोन म्हणजेच फेज दोनच्या अंतर्गत भारतातल्या दोन महत्त्वपूर्ण शहरी जसे की महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बेंगलोर यांच्या दरम्यान अतिशय जलद, दर्जेदार कनेक्टिव्हिटी साठी आठ पदरी म्हणजेच आठ लेनचा एक्सप्रेस वे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

 पुणे ते बेंगलोर एक्सप्रेस विषयी थोडक्यात

तसे पाहायला गेले तर पुणे ते बेंगलोर या एक्सप्रेस वे उभारण्याची चर्चा बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. परंतु या एक्सप्रेस बनवण्यावर शिक्कामोर्तब 2019 मध्ये झाले. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर 2019 नंतर या महामार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. पुणे ते बेंगलोर एक्सप्रेस वे हा दोन भागात विभागला गेलेला आहे. यातील पहिला टप्पा हा महाराष्ट्रातून जातो आणि दुसरा टप्पा हा कर्नाटक राज्यातून जातो. पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे हा सहा लेनचा  असून येणाऱ्या काळामध्ये तो आठ लेनचा देखील करता येऊ शकतो अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात येणार आहे.

हा एक्सप्रेस वे ग्रीनफिल्ड एक्सप्रेस असणार असून  याची एकूण लांबी 702.43 किलोमीटर आहे. हा एक्सप्रेस वे बनवताना अतिशय शिथीलता म्हणजेच फ्लेक्सिबिलिटी ठेवण्यात आली असून बाहेरची बाजू 100 मीटर रुंद आणि आतील बाजू ही 50 मीटर रुंद असे ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जर लेन वाढवायचे ठरवले तर वाढवता येणार आहेत. हा एक्सप्रेस  अशाप्रकारे बनवण्यात येत आहे की याच्यावर जाणारी वाहने हे प्रति तास 120 किलोमीटरने धावू शकतील.

जर आपण सध्या विचार केला तर पुणे ते बेंगलोर हे अंतर 840 किलोमीटर असून ते पार करण्याकरिता पंधरा ते अठरा तासाचा कालावधी लागतो. तसेच मुंबई ते बेंगलोर या दोन शहरांचा विचार केला तर  980 किलोमीटर दोन शहरांचे अंतर असून हे अंतर  पार करण्याकरिता 18 ते 20 तास लागतात. परंतु हा एक्स्प्रेस आहे पूर्ण झाल्यानंतर पुणे ते बेंगलोर हे अंतर अवघ्या सात तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.

मुंबईवरून बेंगलोर जायचे तर दहा तासात हे अंतर पूर्ण करता येणार आहे. प्रवासाचा कालावधी हा निम्म्याने कमी होणार आहे. हा एक्सप्रेस बनल्यानंतर आजूबाजूचा परिसर आणि शहरांमध्ये एक वाहतुकीचे उत्तम साधन निर्माण होणार आहे. तसेच व्यापार व्यवसाय वृद्धी करता देखील चालना मिळणार आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये औद्योगिकरणाला देखील चालना मिळणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील.

 पुणेबेंगलोर एक्सप्रेस वे चा संपूर्ण रूटमॅप

हा महामार्ग महाराष्ट्र ते कर्नाटक या दोन राज्यांमधून जाणार आहे. महाराष्ट्रातील जर आपण विचार केला तर पुणे, सातारा आणि सांगली पार करून कर्नाटक मध्ये नऊ जिल्ह्यातून जसे की बेलारावी, बागलकोट, गडक, विजयनगर, देवनगिरी, चित्रदुर्गा, तुमकुरु आणि बेंगलोर असा त्याचा रूट असणार आहे. जर आपण याचा तपशीलवार रूट पाहिला तर हा एक्स्प्रेसवे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील खोपी या गावापासून आणि काही दिवसात उभारला जाणारा पुणे रिंग रोड पासून सुरू होणार असून त्यापुढे तो खंडाळा, फलटण, कोरेगाव, खटाव,

खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ यासारख्या शहरांमधून जाणारा असून  सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सालाग्रे या गावाजवळ महाराष्ट्रात संपेल. त्यानंतर कर्नाटक राज्यात प्रवेश केल्यानंतर मुडोल, बदामी, रोणा, कोपल, कुडूलीगी, चल्लागिरी,सेरा, नीला मंगलम, तुमकुरु पास करून बेंगलोर जिल्ह्यात असलेल्या दोडामल्ली तालुक्यात संपेल.पुणे बेंगलोर एक्सप्रेसवेचे सगळ्यात जास्त अंतर हे कर्नाटक राज्यात असणार आहे. पुणे ते बेंगलोर या पूर्ण प्रवासामध्ये हा एक्सप्रेस 10 नदींना पार करेल. यामध्ये विचार केला तर एरला, मीरा तसेच चांद नदी, कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा इत्यादी नद्यांना पार करेल.

या 702 किलोमीटर अंतरामध्ये सहा ओव्हर ब्रिज, 42 मुख्य पूल, ७२ बॉक्स टाईप पूल, 59 अंडरपास, 59 लहान अंडरपास, 45 ओव्हर पास, 45 रेगुलर ओव्हर पास, पस्तीस इंटरचेंजेस असे अनेक प्रकारचे बांधकाम यामध्ये समाविष्ट  आहे. या एक्सप्रेस वर इमर्जन्सी कॉलिंग बूथ, सीसीटीव्ही कॅमेरे, टोल प्लाजा इत्यादी महत्वाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

 हा महामार्ग उभारण्याकरता लागणारे साहित्य

पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे उभारणीकरता चाळीस लाख टना पेक्षा जास्त सिमेंट, चाळीस लाख टनांपेक्षा जास्त वाळू, दोन लाख मॅट्रिक्ट टनापेक्षा जास्त स्टील, एक करोड टनांपेक्षा जास्त बोल्डर 1 कोटी टणांपेक्षा जास्त मातीचा वापर केला जातो. या सगळ्या साहित्याच्या एकूण क्वांटिटी वरून आपल्याला अंदाज लावता येतो की हा महामार्ग किती मोठा उभारला जाणार आहे.

 या महामार्गाकरिता लागणारे भूसंपादन

पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे साठी महाराष्ट्र मधून 2900 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. तर कर्नाटक मधून पाच हजार हेक्टर जमिनीचे संपादन आवश्यक असून जर आपण एकूण आकडेवारी पाहिली तर संपूर्ण सात हजार 900 हेक्टर जमीन याकरिता लागणार आहे. हा एक्सप्रेस वे  उभारण्याचा जर आपण अंदाजे खर्च पाहिला तर तो  55 हजार कोटी रुपये इतका आहे. जर आपण सद्यस्थिती पाहिली तर याकरिता जेवढे क्लिअरन्स अर्थात परवानगी आवश्यक होत्या तेवढ्या मिळालेले आहेत.

काही दिवसात भूसंपादनाचे प्रक्रिया देखील वेगात राबवली जाण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर याकरिताचे टेंडर देखील काढले जाणार आहे. सर्व काही व्यवस्थित चालले आणि कुठलाही मोठा अडथळा आला नाही तर साधारणपणे 2028 पर्यंत हा एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

Ajay Patil

Recent Posts