Pune Mahanagarpalika Bharti: सध्या शासनाच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून त्याकरिता अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेले आहेत. राज्यात नुकतेच तलाठी भरती करता देखील अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच राज्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रिक्त जागांकरिता देखील मेगा भरती राबविण्यात येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. साधारणपणे कोरोना कालावधीपासून सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या होत्या. परंतु आता टप्प्याटप्प्याने विविध विभागांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसेच जलसंपदा विभागाचे देखील लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे
.या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत देखील विविध रिक्त पदे भरण्याकरिता भरतीच्या अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरती प्रक्रियेसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.
पुणे महानगरपालिकेत होणार 236 रिक्त जागांकरिता भरती
पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 236 रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून यामध्ये रिक्त पदे व पदसंख्या पुढील प्रमाणे आहेत….
कायदेशीर इंटर्न 06 पदे, अभियांत्रिकी इंटर्न इलेक्ट्रिकल 15 पदे, अभियांत्रिकी इंटर्न पर्यावरण विज्ञान 03 पदे, अभियांत्रिकी इंटर्न सिविल 159 पदे, अभियांत्रिकी इंटर्न कॉम्प्युटर/ आयटी 10 पदे, कंटेंट निर्माता 03 पदे, डेटाबेस प्रशासन 02 पदे, इआरपी एसएपी 03 पदे, नेटवर्क अभियंता 02 पदे, आपत्ती व्यवस्थापक 2 पदे, पदवीधर इंटर्न बीकॉम 27 पदे, जीआयएस कोऑर्डिनेटर 03 पदे आणि जनसंपर्क इंटर्न 01 पदे असे एकूण 236 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदाकरिता संबंधित पदवी यासाठी आवश्यक राहणार आहे.
पदनिहाय किती मिळेल पगार?
कायदेशीर इंटर्न 12 हजार रुपये, अभियांत्रिकी इंटर्न इलेक्ट्रिकल 15 हजार रुपये, अभियांत्रिकी इंटर्न सिव्हिल 15 हजार रुपये, अभियांत्रिकी इंटर्न पर्यावरण विज्ञान 12 हजार रुपये, अभियांत्रिकी इंटर्न कम्प्युटर/ आयटी 15 हजार रुपये, कंटेंट निर्माता 12000, डेटाबेस प्रशासक 15000, ईआरपी एसएपी 15 हजार रुपये, नेटवर्क अभियंता 15 हजार रुपये, आपत्ती व्यवस्थापक 12000 रुपये, पदवीधर इंटर्न बीकॉम 12 हजार रुपये, जनसंपर्क इंटर्न 12 हजार रुपये आणि जीआयएस कोऑर्डिनेटर 15 हजार रुपये अशा पद्धतीचे वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण
पुणे महानगरपालिका,पुणे
या भरती करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट www.pmc.gov.in ही आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
तुम्ही या भरतीकरिता इच्छुक असाल तर यासाठीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 ऑगस्ट २०२३ आहे.