Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणे शहर राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शहरात गेल्या काही दशकांपासून परराज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक स्थाईक झाले आहेत.
यामध्ये राजस्थानमधून येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे पुणे ते राजस्थान आणि राजस्थान ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे.
दरम्यान, पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या राजस्थानमधील जनतेसाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. रेल्वेच्या उत्तर पश्चिम विभागाने पुणे ते राजस्थान दरम्यान एक स्पेशल एक्सप्रेस ट्रेन सुरू केली आहे. पुणे ते बिकानेर दरम्यान ही गाडी सुरू झाली आहे.
आज अर्थातच 30 मे 2023 पासून या मार्गावर ही एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय झाला आहे. पुणे शहरात राजस्थान राज्यातील नागरिक मोठया प्रमाणात स्थायिक झाले आहेत. पण सध्या पुणे ते राजस्थान दरम्यान प्रवास करण्यासाठी केवळ एकच साप्ताहिक ट्रेन सुरू आहे.
ही ट्रेन दर रविवारी पुणे ते भगत की कोठी या रेल्वेस्थानकापर्यंत धावते. अशा परिस्थितीत या मार्गावर आणखी एक ट्रेन सुरू व्हावी अशी प्रवाशांची मागणी होती. या मागणीवर आता रेल्वेने सकारात्मक निर्णय घेतला असून पुणे ते बिकानेरदरम्यान एक नवीन साप्ताहिक ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या गाडीच्या वेळापत्रकाबाबत, रूटसंदर्भात आणि या ट्रेनला कुठे थांबे देण्यात आले आहेत? या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे बिकानेर साप्ताहिक गाडीचे वेळापत्रक
ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून दर मंगळवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी रात्री पावणे नऊ वाजता बिकानेर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच बिकानेर रेल्वे स्थानकावरून ही गाडी दर सोमवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पुण्याकडे रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी अर्थातच मंगळवारी सकाळी सात वाजून 35 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कुठे राहणार थांबा?
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते बिकानेर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या 20 डब्ब्याच्या रेल्वेला वसई रोड, पालनपुर, मारवाड जंक्शन, भगत की कोठी, जोधपूर, मेरठ रोड, बिकानेर या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. निश्चितच, या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास आणखी सोयीचा होणार आहे.
हे पण वाचा :- आज अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह ‘त्या’ 13 जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाची माहिती