Exclusive

तुम्हाला माहिती आहे का आयपीएस मनोज शर्मा आणि आयआरएस श्रद्धा जोशी यांच्या प्रेमळ नात्याची कथा? वाचा पती-पत्नीचे नाते असावे कसे?

कुठल्याही प्रकारचे नाते म्हटले म्हणजे यामध्ये एकमेकांच्या मनाचे बंध, एकमेकांना समजून घेण्याची असलेली क्षमता आणि एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी  असं एकंदरीत सरमिसळ असे मिश्रण असते. या सगळ्या नातेसंबंधांमध्ये जर आपण पती-पत्नीचे नाते पाहिले तर ते विश्वास नावाच्या एका नाजूक धाग्यावर बांधलेले असते.

त्यामुळे हे एक संवेदनशील नाते म्हणून ओळखले जाते. या अनुषंगाने पती-पत्नी मधील नाते कसे असावे? हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या आयुष्यावरून तुम्हाला कळून येईल.

या दांपत्याच्या जीवनावर विक्रांत मॅसी आणि मेधा शंकर स्टारर असलेला 12th Fail हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला असून सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची खूप चर्चा होताना दिसून येत आहे. यामध्ये या दोघांची जीवनातील संघर्ष दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे या लेखात आपण मनोज शर्मा आणि श्रद्धा जोशी यांच्या जीवनातील खाचखळगे व त्यांची लव स्टोरी समजून घेणार आहोत.

 कशी झाली प्रेम प्रकरणाची सुरुवात?

मनोज शर्मा व श्रद्धा जोशी यांची प्रेमाची कथा म्हणजेच लव स्टोरी पाहिली तर ती खूप वेगळी अशी आहे. प्रेमाची ताकद काय असते या गोष्टीवर विश्वास असलेल्या मनोज शर्मा यांना त्यांच्या जीवनात साथ लाभली ती श्रद्धा जोशी यांची. यूपीएससीची तयारी करत असताना मुखर्जी नगर येथील कोचिंग सेंटर मध्ये त्यांची पहिली भेट झाली

व पहिल्या नजरेमध्ये मनोज हे श्रद्धा यांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाले. परंतु यामध्ये श्रद्धा ने सुरुवातीला त्यांना प्रेमात नकार दिला. त्यानंतर निदान दोघांमध्ये मित्रता तरी होऊ शकते  याकरिता मनोज यांनी खूप कष्ट घेतले. यामध्ये पाहिले तर श्रद्धा यांना चहाची खूप आवड असल्यामुळे मनोज यांनी चहा कसा बनवायचा हे देखील शिकून घेतले. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये दोघांनी त्यांचे ध्येय साध्य केले आणि एकमेकांवर खूप नितांत असे प्रेम केले.

 दोघांच्या नात्यावरून आपल्याला काय शिकायला

मिळेल?

1- एकमेकांना बद्दल प्रामाणिक राहणे विश्वास ठेवणे गरजेचे जगातील प्रत्येक नाते हे विश्वासाच्या पायावर उभे आहे. विश्वास जर डळमळीत झाला तर वेळ लागत नाही. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये कुठल्याही प्रकारची शंका घेण्याला जागा ठेवू नये किंवा शंका घेऊ नये. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीचा विश्वास कधीही तोडू नये.

2- नात्यांमध्ये गैरसमजला थारा देऊ नये कुठलीही गोष्ट मनात ठेवू नये आणि मोकळेपणाने एकमेकांशी बोलावे. तसेच इतरांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी द्यावी व आयुष्यात पैशांपेक्षा माणसांवर जास्त विश्वास ठेवावा. नात्यांमध्ये संवाद असणे खूप गरजेचे असते. जर संवाद बिघडला तर मात्र परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये देखील कम्युनिकेशन चांगले असणे खूप गरजेचे आहे.

 आयपीएस मनोज शर्मा आणि आयआरएस श्रद्धा जोशी नेमके कोण आहेत?

आपण मनोज कुमार यांचा विचार केला तर ते यूपीएससी 2005 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्र केडरमधील अधिकारी असून ते मध्य प्रदेश राज्यातील मुरैना जिल्ह्यातील जोरा तालुक्यातील बिलगाव या खेडे गावातील रहिवासी आहेत. सध्या ते डीआयजी सीआयएसएफ पदावर कार्यरत आहेत. मुंबई विमानतळाची सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तर श्रद्धा जोशी या यूपीएससी 2007 बॅचच्या भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत.

Ajay Patil

Recent Posts