ग्रामीण भागातील विकासासाठी ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत जनावरांसाठी पक्का गोठा बांधण्याकरिता म्हणजेच गाय व म्हैस यांचा गोठा बांधण्यासाठी 77 हजार 118 रुपये इतके अनुदान दिले जाते व तुमच्याकडे जर सहा पेक्षा जास्त जनावरे असतील तर अनुदानाची रक्कम देखील वाढून मिळते. एवढेच नाही तर शेळ्यांकरिता देखील शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.
साधारणपणे दहा शेळ्यांकरिता 49 हजार 24 अनुदान व दहापेक्षा जास्त शेळ्यांची संख्या वाढवली तर हे अनुदान दुपटीने देखील मिळू शकते. या व्यतिरिक्त कुक्कुटपालनाकरिता देखील या योजनेच्या माध्यमातून अनुदान देय आहे. यासोबतच नाडेप कंपोस्ट खत बनवण्याकरिता देखील या योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ मिळतो. अशा पद्धतीने ही योजना खूप फायदेशीर अशी योजना असून शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजने मधून कोणत्या कामांसाठी मिळते अनुदान?
1- या योजनेच्या माध्यमातून गाय म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधण्याकरिता अनुदान मिळते.
2- शेळीपालन करण्यासाठी तसेच शेळीपालनाकरिता आवश्यक शेड बांधण्यासाठी देखील या योजनेअंतर्गत अनुदान मिळते.
3- कुक्कुटपालनाकरिता शेड बांधण्यासाठी देखील शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमधून अनुदान देण्यात येते.
4- भू संजीवनी नाडेप कंपोस्ट खत याकरिता देखील शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमधून अनुदान मिळतं.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
1- या योजनेकरिता अर्ज करायचा असेल तर तो तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागतो आणि त्या ठिकाणी सबमिट करावे लागतो.
2- या ठिकाणी अर्ज करताना आपण ज्यांच्याकडे अर्ज करणार आहोत त्याच्या नावासमोर टिक करणे गरजेचे आहे. समजा तुम्ही सरपंचाकडे अर्ज दाखल करणार असाल तर तुम्ही सरपंच या नावासमोर टिक करणे गरजेचे आहे. त्यानुसारच ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करत असाल तर त्यांच्या नावासमोर टिक करावे.
3- त्याचप्रमाणे अर्जामध्ये आपण ज्याच्या नावावर अर्ज करत आहात त्याचे नाव, पत्ता तसेच मोबाईल नंबर हे सर्व जोडायचे असून त्यानंतर आपल्याला सरपंच तसेच ग्रामसेवक यांचा ग्रामसभेचा ठराव देखील या योजनेसाठी घेणे गरजेचे आहे.
4- ठराव घेतल्यानंतर तुम्ही दाखल केलेल्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन म्हणजे छाननी केली जाते व त्यानंतर तुम्ही केलेल्या अर्जाची पोचपावती तुम्हाला पंचायत समितीकडून मिळते.
पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?
1- सदर व्यक्ती हा भूमीहीन असणे गरजेचे आहे व दुसरे म्हणजे शेतकरी तरी असला पाहिजे.
2- तसेच या योजनेकरिता अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे मनरेगाचे जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे.
3- यामध्ये अगोदर जनावरांचे टॅगिंग असणे गरजेचे होते. परंतु आता ही अट शिथिल करण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराकडे आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि अर्जदाराचे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.