Exclusive

शेअर मार्केट : ‘हा’ 15 रुपयाचा स्टॉक पोहचला 2 हजार रुपयांवर, गुंतवणूकदार बनलेत मालामाल

Share Market Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना काही स्टॉकमधून लाखो रुपयांचा परतावा मिळतो. तर काही स्टॉकमधील गुंतवणूक गुंतवणूकदारांच्या अंगलट देखील येत असते. मात्र अनेकदा लॉन्ग टर्म गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.

दरम्यान शेअर मार्केट मधील एका स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये असाच बम्पर परतावा दिला आहे. शेअर मार्केटच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर कधीकाळी पंधरा रुपयावर ट्रेड करणारा स्टॉक आजच्या घडीला दोन हजारावर पोहोचला आहे.

आज आपण याच स्टॉक संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण ज्या स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत तो बारा वर्षांपूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर मात्र पंधरा रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होता पण आता बारा वर्षानंतर हा स्टॉक दोन हजार रुपयांवर ट्रेड करत आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या स्टॉक संदर्भात.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ‘या’ तारखेला होणार उदघाट्न, कसा राहणार मार्ग? वाचा….

कोणता आहे तो स्टॉक

हा स्टॉक आहे स्पेशालिटी केमिकल कंपनी दीपक नायट्रेटचा. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा दीपक नायट्रेटचा स्टॉक 2011 मध्ये केवळ 15 रुपयावर बीएसई अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर ट्रेड करत होता. मात्र आता बारा वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर हा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 2000 रुपयांवर ट्रेड करत आहे.

म्हणजे या शेअरने 12 वर्षांत जवळपास 11500 टक्क्यांचा परतावा आपल्या गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे. यामुळे या शेअरमध्ये बारा वर्षांपूर्वी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार निश्चितच मालामाल बनले असतील.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉक मध्ये बारा वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असेल आणि ती गुंतवणूक आतापर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर अशा गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळाला असेल.

हे पण वाचा :- कर्ज घेण्याचा प्लॅन आहे का? मग लोन घेण्यासाठी किती सिबिल स्कोर लागतो? हे जाणून घ्या

ब्रोकरेज म्हणतात की…

ब्रोकरेज फर्म रेलिगेअर ब्रोकिंगने दीपक नायट्रेटच्या शेअरला बाय रेटिंग दिले आहे. विशेष म्हणजे या ब्रोकरेज फर्मने या स्टॉकची टारगेट प्राइस 2280 रुपये एवढी ठेवली आहे. सध्या हा स्टॉक 2070 रुपयांवर पोहचला आहे आणि येणाऱ्या काळात 2280 रुपयांपर्यंत हा स्टॉक पोहोचू शकतो असा या फर्मने दावा केला आहे. निश्चितच येणाऱ्या काळात देखील या स्टॉक मध्ये वाढ होण्याची शक्यता या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्यां गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी राहणार आहे.

मित्रांनो, येथे दिलेली माहिती ही केवळ स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात असते. हा कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला नाही याची नोंद घ्यायची आहे. 

हे पण वाचा :- चिंताजनक ! मान्सूनचे आगमन तब्बल ‘इतके’ दिवस उशिराने होणार? 11 दिवसापासून मान्सून अंदमानातच, IMD काय म्हणतंय पहा….

Ajay Patil

Recent Posts