Snake Information:- समाजामध्ये बऱ्याच गोष्टींविषयी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा गैरसमज असतात. असे तथ्य किंवा अंधश्रद्धा किंवा गैरसमज हे पूर्वापार चालत आलेले असतात व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते जात असतात. असे गैरसमज माणसाच्या मनामध्ये इतके घट्ट होतात की माणूस त्या गोष्टींवर खूप विश्वास ठेवायला लागतो. हीच बाब अंधश्रद्धेच्या बाबतीत बऱ्याचदा दिसून येते.
अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली अशी कीड आहे की यामुळे व्यक्तीचेच नव्हे तर समाजाचे देखील मोठ्या नुकसान होण्याची शक्यता असते व त्याच पद्धतीने पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टींबद्दलचे गैरसमज देखील तेवढेच घातक किंवा धोकादायक असतात. असेच काही गैरसमज किंवा त्याला आपण अंधश्रद्धा म्हटले तरी चालेल असे सापांच्या बाबतीत दिसून येतात. त्यामुळे या लेखात आपण सापांच्या बाबतीत असलेले गैरसमज आणि त्यातील सत्यता त्याबद्दलची माहिती या लेखात बघणार आहोत.
सापाबद्दल असलेले गैरसमज आणि सत्य परिस्थिती
साप म्हटले म्हणजे आपण सगळे त्याला घाबरतो. या अनुषंगाने सापांच्या बाबतीत समाजामध्ये पूर्वापार चालत आलेले अनेक प्रकारचे गैरसमज असून त्यातीलच एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे जेव्हा नाग नागिन सोबत राहतात व यापैकी जर नागाला किंवा नागिनीला मारले तर व्यक्तीचा नागाकडून किंवा नागिनी कडून बदला घेतला जातो असा एक समज पूर्वापार चालत आलेला आहे.
एवढेच नाही तर ज्याने मारले त्याची प्रतिमा नाग त्याच्या डोळ्यांमध्ये ठेवतो आणि नागिन त्या व्यक्तीचा शोध घेते व त्याला संपवते. परंतु याबद्दल जर विचार केला तर हा एक गैरसमज आहे यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. जर आपण ऑस्ट्रेलिया मधील व्हिक्टोरिया म्युझियमचा विचार केला तर या ठिकाणी अनेक प्रकारच्या सापांच्या प्रजातीवर अभ्यास करण्यात आला व त्या माध्यमातून काही मिथक व सत्य सांगण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही पुढील प्रमाणे…..
1- वाटीतले दूध साफ प्यायला येतो का?- बऱ्याचदा आपण ऐकतो की वाटीमध्ये जर दूध ठेवले तर ते दूध प्यायला साप येतो. आपल्यापैकी बरेच जण लहानपणी नागपंचमीच्या दिवशी वाटीमध्ये दूध घेऊन जातात व वारुळाजवळ ठेवतात. परंतु या मागील खरी स्थिती पाहिली तर सरपटणारे प्राण्यांना दुग्धजन्य पदार्थ पचायला खूप जड जातात म्हणून ते दूध प्यायला फारसे तयार नसतात. परंतु जर तहान लागली तर ते दूध पिऊ शकतात.
2- सापांना ऐकू येत नाही– बरेच जण म्हणतात किंवा आपल्याला वाटते की साप बहिरे असतात किंवा त्यांना ऐकायला येत नाही. परंतु यामागील जर सत्यस्थिती पाहिली तर सापांचे कान जरी आपल्याला बाहेर दिसत नसले तरी त्यांना अंतर्गत कान असतात म्हणजे त्यांची शारीरिक रचनाच तशी असते. अगदी सूक्ष्म जरी जमिनीचे कंपन झाले तरी त्यांना ते कळते.
3- साप विषारी असतात– साप म्हटले म्हणजे सापे विषारी असतात व त्यांनी चावा घेतल्यानंतर माणूस मरतो हा एक समज आहे. परंतु सापांच्या प्रजातींचा विचार केला तर सगळ्या सापांच्या जाती या विषारी नसतात. जमिनीवर जे काही सापांच्या प्रजाती आढळून येतात त्यापैकी तब्बल 40% साप विषारी नसतात.
4- साप जोडीने फिरतात– साप सतत जोडीने फिरतात असे देखील बरेच जण म्हणतात. परंतु या मागील जर आपण सत्य पाहिले तर सर्वसामान्यपणे प्रणय आणि मिलनाच्या कालावधीतच दोन साप एकाच ठिकाणी असतात. चालताना किंवा फिरताना जोडीने फिरत नाहीत.
5- सापाची मादी पिल्लांना गिळते– याबद्दल देखील बरेच जण म्हणतात की सापाची मादी पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्यांना गिळते व एखादा धोका लक्षात घेऊन ही कृती सापाच्या मादी कडून होत असते. परंतु जर सापाने असं काही केल तर स्वतः त्याचा बचाव होणे शक्य नाही. यामध्ये फक्त बेडूक किंवा बगळे असे करू शकतात कारण ते जठरामध्ये अशा पद्धतीने गिळलेले अन्न ठेवतात आणि नंतर खातात किंवा ते पचवतात. परंतु सापाच्या बाबतीत हे शक्य नाही.
6- सापाचे डोके तोडले तर तो सूर्यास्तापर्यंत जगतो– बरेच जण म्हणतात की सापाचे डोके कापल्यानंतर सापाचे शरीर काही काळ सक्रिय राहते. परंतु असे डोके कापल्यानंतर साप सूर्यास्तापर्यंतच किंवा सूर्यास्त होईपर्यंत जिवंत राहतो असे नाही.
7- जर तुम्ही कोब्राला मारले तर दुसरा कोब्रा तुमचा बदला घेतो– यात थोडे देखील सत्य नाही. कारण सापाला कुठल्याही प्रकारचे सामाजिक बंधन नसल्यामुळे किंवा तो अशा हल्लेखोराला ओळखू शकत नाही. बुद्धिमत्ता किंवा सापाचे स्मरणशक्ती इतकी तीक्ष्ण नसते की तो कुणाला ओळखू शकेल.