Snake Interesting Fact:- साप आणि सापाच्या असलेल्या विविध प्रजाती यांचे वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य असून रंगापासून तर विषारी असण्यापर्यंत वेगळेपण दिसून येते. भारतामध्ये ज्या काही सापांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत त्यापैकी बोटावर मोजता येतील इतक्या जाती या विषारी वर्गात असून त्यापैकी चार जाती अति विषारी आहेत.
भारतामध्ये नाग, फुरसे, घोणस आणि मन्यार या जाती जास्त विषारी आहेत. सापाबद्दल आपण अनेक प्रकारच्या मनोरंजक अशा काही गोष्टी ऐकल्या असतील. अगदी याच पद्धतीने आपल्या मनात कधीतरी असा विचार आला असेल की सापाला मेंदू असतो का किंवा इतर प्राण्यांइतका साप बुद्धिमान असतो का? याच संबंधीची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
सापाला मेंदू असतो का?
सजीव प्राण्यांपैकी बऱ्याच प्राण्यांना मेंदू असतो परंतु यामध्ये सापासारखा प्राण्यांना देखील मेंदू असतो का? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर होय असेच आहे. साप माणसांन इतके वेगवान असतात की कुत्रे मांजर इतके जलद काम करू शकतात का?ते काही गोष्टी पटकन शिकू शकतात का?
इत्यादी प्रश्न देखील आपल्याला पडले असतील. जर सापांच्या बाबतीत असलेल्या आपण अनेक पौराणिक कथा पाहिल्या तर त्यामध्ये साप मानवाचे रूप घेऊ शकतात. ते बदला घेऊ शकतात. आपल्या जोडीदाराला मारलेल्या व्यक्तीला लक्षात ठेवू शकता व त्याला ते शोधू शकता.
हे झाले पौराणिक कथांमधील काही रंजक गोष्टी. परंतु यामध्ये शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की सापाच्या मेंदूमध्ये अशी क्षमता अजिबात नसते. तसेच इतर प्राणी जशा काही गोष्टी पटकन शिकू शकतात तसेच साप इतर प्राण्यांप्रमाणे शिकू शकत नाही. साप सरपटणारा प्राणी आहे व याचा मेंदू नियमित असतो
व या मेंदूमध्ये एक मज्जा संस्था असते. साप हे वास घेऊ शकतात व स्वतःला धोका असल्याचे त्यांना पटकन जाणवते. साप इतर प्राण्यांशी लढू शकतात व शिकार देखील करू शकतात. यासंबंधीची सगळी जाणीव त्यांच्या मनात तयार होत असते.
सापाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी
साप सरपटणारे प्राणी आहेत म्हणून ते पृष्ठवंशी प्राणी देखील आहेत. त्यांना पाठीचा कणा आणि मज्जा संस्था देखील असते. त्यांना वेदना जाणवू शकतात. माणसांच्या तुलनेमध्ये त्यांना स्पर्शाची जाणीव खूप कमी असते. परंतु साप जिभेतून वास घेतात व जिभेतून वास घेण्याची त्यांची ही क्षमता मानवी नाकाच्या वासाच्या शक्ती पेक्षा खूप जास्त आहे.
सापांना माणसांसारखी कुठल्याही प्रकारचे स्मरणशक्ती नसते. परंतु काही काही गोष्टी त्यांना नक्कीच आठवू शकतात. सापे इतर प्राणी ओळखण्यास आणि लक्षात ठेवण्यामध्ये असमर्थ आहेत म्हणजे ते ओळखू शकत नाही. सापाच्या मेंदूचा विचार केला तर तो त्याच्या आकारानुसार असतो.
म्हणजे सापाच्या शरीराचे वजन आणि मेंदूच्या वजनाचे प्रमाण हे 1500 पैकी एक आहे. सापाचा मेंदू हा त्यांच्या शरीराचा फक्त एक टक्का असतो. म्हणजेच सहा फूट लांब सापाच्या मेंदूचे वजन फक्त काही ग्रॅम इतके असते.जर आपण माणसाच्या मेंदूचा विचार केला तर तो काहीसा गोल आकाराच्या मुठीसारखा दिसतो.
सापाच्या मेंदूची रचना काहीशी लांब असते. त्याचा ब्रेन स्टेम पुढच्या मेंदूला जोडलेला असतो. सापाचा मेंदू हा इतर सस्तन प्राणी आणि पक्षांच्या मेंदू पेक्षा खूप वेगळा असतो. सापाच्या मेंदू मार्फत सापाच्या इंद्रियांना वेगवेगळ्या क्षमता देण्यात येतात. सापाची वास घेण्याची क्षमता माणसांपेक्षा हजारो पटीने जास्त असते.
ते मानवापेक्षा अधिक स्पष्टपणे पाहू शकतात. सापांना मात्र बाह्य कान नसतात पण तरी ते काही आवाज ऐकू शकतात. सापाला मेंदू असतो परंतु त्यांच्या तीव्र भावना नसतात. परंतु सापाच्या मेंदूमुळे मादी सापाला तिच्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी मदत होते. परंतु माणसांप्रमाणे त्यांच्यामध्ये त्याचे किंवा प्रेमाची भावना नसते. त्यांना कुठल्याही प्रकारची भावना समजत नाही