Exclusive

मोठी बातमी ! राज्य कर्मचारी पुन्हा आंदोलन पुकारणार; आता काय आहे मागणी? वाचा

State Employee Strike : राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबादीचा चौथा हफ्ता वितरित केला जाणार आहे.

यासाठी वित्त विभागाने शासन निर्णय देखील निर्गमित केला आहे. या जीआर मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनासोबत तसेच पेन्शनसोबत सातवा वेतन आयोगाचा थकबाकीचा चौथा हप्ता मिळणार आहे.

निश्चितच हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे आणि यामुळे संबंधितांना दिलासा मिळणार असून त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. पण अशातच सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी संदर्भात एक मोठी अचंबीत करणारी आणि अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ‘या’ तारखेला होणार उदघाट्न, कसा राहणार मार्ग? वाचा….

हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ताच मिळालेला नाही. यामध्ये राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

म्हणजे राज्य शासन चौथा हप्ता वितरित करण्यासाठी जीआर निर्गमित करत आहे मात्र प्रत्यक्षात याआधीचेच हप्ते काही कर्मचाऱ्यांना मिळालेले नाहीत. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकबाकीचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला नसल्याचे काही शिक्षकांच्या माध्यमातून समोर आले होते.

दरम्यान आता हे कर्मचारी आक्रमक बनले असून लवकरात लवकर थकबाकीचे हप्ते मिळावेत अशी मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेकडे बाकी राहिलेले हफ्ते लवकर मिळावेत अशी मागणी केली आहे.

हे पण वाचा :- कर्ज घेण्याचा प्लॅन आहे का? मग लोन घेण्यासाठी किती सिबिल स्कोर लागतो? हे जाणून घ्या

विशेष बाब म्हणजे आता संघटनेच्या माध्यमातून यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. संघटनेने संबंधित कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला, दुसरा तसेच तिसरा हप्ता आणि हा चौथा हप्ता जून महिन्याच्या वेतनासोबतच कर्मचाऱ्यांना वर्ग करावा अशी मागणी केली आहे.

तसेच ही मागणी पूर्ण झाली नाही तर संघटनाने थाळी नाद आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे आता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने दिलेल्या या इशाऱ्यानंतर सरकारला जाग येणार का? या संबंधित कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोग फरकाचे उर्वरित हप्ते जून महिन्याच्या वेतनासोबत तसेच पेन्शन देयकासोबत मिळणार का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

पण जर सरकारने कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य केली नाही तर निश्चितच आगामी काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे. 

हे पण वाचा :- चिंताजनक ! मान्सूनचे आगमन तब्बल ‘इतके’ दिवस उशिराने होणार? 11 दिवसापासून मान्सून अंदमानातच, IMD काय म्हणतंय पहा….

Ajay Patil

Recent Posts