Success Story : नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळासह मनमाड, नांदगाव या परिसरातील बहुतांशी शेतकरी कांदा या नगदी पिकाची शेती करतात. तसेच खरीप हंगामात मका या पिकाची देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
एकंदरीत पारंपारिक पीक लागवडीवर येथील शेतकऱ्यांचा अधिक मदार आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती झाली आहे.
यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी बनत चालला आहे. परिणामी कळवण, सटाणा, मालेगाव देवळा अर्थातच कसमादे परिसरात तसेच नांदगाव तालुक्यासह परिसरात आता शेतकऱ्यांनी शेतीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे.
आता येथील शेतकरी नवनवीन नगदी पिकांची शेती करत आहेत. औषधी पिकांची शेती देखील आता परिसरात होऊ लागली आहे. विशेष म्हणजे औषधी पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसनंतर महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या मार्गांवरही सुरु होणार Vande Bharat Train, वाचा….
मनमाडजवळच्या पांझणदेव येथील बाळासाहेब पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने देखील औषधी वनस्पतीच्या शेतीत आपले नशीब आजमावले आहे. कांदे, मका, बाजरी अशा पिकांमधून खूपच कमी उत्पन्न मिळत असल्याने या प्रयोगशील शेतकऱ्याने या पिकांना फाटा देत जिरेनियमची लागवड केली आहे.
विशेष बाब म्हणजे आता जिरेनियमची लागवड यशस्वी झाली असून त्यांना दर तीन महिन्यांनी लाखो रुपयांचे उपन्न मिळत आहे. यामुळे सध्या परिसरात हा प्रयोग चर्चेचा विषय ठरत आहे. बाळासाहेब सांगतात की जिरेनियम लागवड करण्याचा सल्ला त्यांच्या लेकीने त्यांना दिला.
त्यांची लेक माधुरी हीने बीटेक एग्रीकल्चरमध्ये शिक्षण घेतले असल्याने तिला जिरेनियम पिकाबाबत चांगली माहिती होती. यामुळे तिने आपल्या पित्याला जिरेनियम लागवडीचा सल्ला दिला आणि बाळासाहेब यांनी या सल्ल्याचे पालन करत सहा एकर जमिनीवर जिरेनियम शेती सुरू केली.
हे पण वाचा :- खुशखबर ! अंगणवाडी सेविकांना ‘या’ महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव मानधनाचा लाभ, राज्य सरकारचा मोठा निर्णय
जिरेनियम या सुगंधी औषधी वनस्पती पासून तेल काढले जाते आणि बाजारात या तेलाला चांगली मागणी असते. म्हणून बाळासाहेब यांना या जिरेनियम शेतीतून लाखो रुपयांची कमाई आता होऊ लागली आहे.
कृषी तज्ञ सांगतात की जिरेनियम पिकाला अधिक रोगराई लागत नाही, याला जनावरे देखील खात नाहीत, विशेष बाब म्हणजे गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी यांसारख्या संकटांचा देखील या पिकावरील विपरीत परिणाम होत नाही. अर्थातच या पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न या ठिकाणी मिळते.
बाळासाहेब यांना देखील जिरेनियम पिकाच्या शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळाले असून कमी खर्चात अधिक कमाई होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. निश्चितच बाळासाहेबांचा हा प्रयोग इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील दिशा दाखवण्याचे काम करणार आहे.
हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! या बँकेत निघाली मोठी भरती, आजच ‘या’ इमेलवर पाठवा आपला अर्ज