Business Idea :- कुठलाही व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोक्यात विचार येतो तो म्हणजे व्यवसाय करावा तर कोणता करावा आणि एकदाची व्यवसायाची निश्चिती झाली तर त्यासाठी लागणारे भांडवल आणि सगळ्या गोष्टी पूर्ण करून व्यवसायाला सुरुवात करण्याअगोदर आपल्या डोक्यात येतो तो व्यवसायातून मिळणाऱ्या नफा हा होय. त्यामुळे गुंतवणूक कमीत कमी आणि जास्तीत जास्त नफा हे तत्व समोर ठेवून बरेच जण व्यवसायाची निवड करतात व व्यवसाय सुरू करतात.
व्यवसायामध्ये भरपूर अशा व्यवसाय कल्पना आहेत की ज्या माध्यमातून कमीत कमी भांडवलात तुम्ही चांगला व्यवसाय उभारू शकतात. यामधील एक व्यवसाय जर आपण पाहिला तर तो म्हणजे टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. या फॅशनच्या युगामध्ये टी-शर्टला खूप महत्त्व असून अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत टी-शर्ट घालतात. त्यामुळे कमीत कमी भांडवलामध्ये टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय तुम्हाला चांगला पैसा देऊ शकतो.
कमीत कमी भांडवलात सुरू करा टी–शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय
अगदी पन्नास हजार रुपयांमध्ये तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येणे शक्य आहे. म्हणजेच 50 हजार रुपये भांडवला मध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत आर्थिक नफा मिळवू शकतात. कारण आपण सध्या बाजारपेठेचा विचार केला तर प्रिंट केलेल्या टी-शर्टला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो.
जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सुरुवातीला 50 हजार ते 70 हजार रुपयांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट याकरिता तुम्हाला लागेल. परंतु काही दिवसांनी व्यवसाय स्थिर स्थावर झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक महिन्याला 30 ते 40 हजार रुपये आरामात कमवू शकतात. तसेच तुमचा व्यवसाय वाढावा आणि त्याची विक्रीत वाढ व्हावी याकरिता तुम्ही सोशल मीडिया आणि काही ई-कॉमर्स साईटचा वापर करून चांगली कमाई करू शकतात.
किती लागेल खर्च आणि किती मिळतो नफा?
जर आपण या क्षेत्रातील जाणकारांचा विचार केला तर त्यांच्यानुसार प्रिंटेड टी शर्ट चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला एक प्रिंटिंग मशीन ची आवश्यकता भासते व ती मशीन तुम्हाला साधारणपणे पन्नास हजार रुपयांपर्यंत मिळते. या व्यवसायातील प्रमुख कच्चामाल म्हणजे तुम्ही साधी सफेद रंगाची टी-शर्ट हे 120 रुपये किमतींवर प्रिंट करू शकता. 120 रुपयांमध्ये प्रिंट केलेला हा टी-शर्ट तुम्ही 250 ते 300 रुपयांमध्ये आरामात विक्री करू शकतात. या पद्धतीने उत्तम नफा
तुम्हाला मिळेल. हा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला दोन प्रकारच्या मशीनची आवश्यकता भासते.यातील एक म्हणजे मॅन्युअल मशीन आणि दुसरे म्हणजे ऑटोमॅटिक मशीन हे होईल. परंतु सुरुवात करताना तुम्ही मॅन्युअल मशीन ने सुरुवात करणे गरजेचे आहे व या माध्यमातून कमाईत वाढ झाली की तुम्ही ऑटोमॅटिक मशीन घेऊ शकतात. मॅन्युअल मशीनच्या माध्यमातून तुम्ही एका मिनिटांमध्ये एक टी-शर्ट प्रिंट करू शकतात. म्हणजेच तुम्ही एका दिवसाला जर दहा टी-शर्ट प्रिंट केले तरी तुम्ही एका महिन्याला तीनशे टी-शर्ट प्रिंट करू शकतात.
या तीनशे टी-शर्ट पैकी जर तुम्ही प्रत्येक टी-शर्ट 100 रुपये घेतले तरी तुम्ही सहजपणे तीस हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकतात. जर तुम्ही यामध्ये स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक मशीन घेतले तर तुम्ही जास्त प्रमाणात टी-शर्ट प्रिंट करून ते विक्री केली तर तुमचा नफा देखील मोठ्या प्रमाणावर वाढेल. अशा पद्धतीने हा व्यवसाय खूप महत्त्वपूर्ण असून जर तुम्हाला कमीत कमी भांडवलात जास्त नफा देणारा व्यवसाय सुरू करायचा असेल तर टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय खूप महत्त्वपूर्ण ठरेल.