Exclusive

या शेतकऱ्याने तर कमालाच केली! चक्क पत्रांच्या डब्यांचा वापर करून तयार केले ट्रॅक्टर, बघा शेतकऱ्याचा अनोखा जुगाड

सध्या शेतकरी अनेक प्रकारचे जुगाड करून अनेक शेती उपयोगी यंत्र तयार करत असून कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी किमतीत शेतकऱ्यांना या यंत्राचा वापर करून फायदा होताना दिसून येत आहे. शेतकरी शेतीमध्ये असताना अनेक प्रकारचे प्रयोग करत असतात व असे प्रयोग करत असताना अनेक भन्नाट कल्पना सुचतात व अशा वेळेस या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे महत्त्वाचे काम शेतकऱ्यांकडून केले जाते.तुम्ही वाचले असेल की अनेक तरुण शेतकऱ्यांनी कोळपणी यंत्र, पिकांसाठी फवारणी यंत्र असे बरेच आवश्यक साहित्य हे जुगाड करून बनवले.

जुगाड करून म्हणजे घरातील रिकाम्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून अशा वस्तू शेतकऱ्यांच्या माध्यमातून बनवल्या जात आहेत. परंतु स्वतःजवळ ट्रॅक्टर घ्यायला पैसे नाहीत म्हणून घरातीलच जुन्या भंगार च्या वस्तू पासून ट्रॅक्टर तयार केला हे जर तुम्ही ऐकले किंवा वाचले तर तुमचा विश्वास बसणार नाही.

कारण साहजिकच आहे की घरातील भंगार वस्तूंपासून कसं काय ट्रॅक्टर तयार होऊ शकतो? हा प्रश्न प्रत्येकाला नक्कीच पडणार. परंतु अशीच एक आगळी वेगळी किमया एका कल्पक शेतकऱ्याने करून दाखवली असून त्याचा व्हिडिओ देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

 बिहार मधील शेतकऱ्याने तयार केला जुगाड  करून ट्रॅक्टर तयार

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बिहारमधील एका शेतकऱ्याने जुगाड करून ट्रॅक्टर तयार केला असून हा ट्रॅक्टर पाहिला तर या क्षेत्रातील अभियंते देखील आश्चर्यचकित होतील असा हा ट्रॅक्टर बनवण्यात आला आहे. स्वतःकडे ट्रॅक्टर घेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून घरातील जुन्या भंगार वस्तूंचा उपयोग ट्रॅक्टर तयार करण्यासाठी या शेतकऱ्याने केला.

याकरता या शेतकऱ्याने तेलाचे डबे, लाकूड तसेच चुना, भंगारातील गाड्यांची चाके आणि पाणी खेचण्याचा पंप यांचा वापर केला आहे. या सगळ्या घरातील जुन्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून या शेतकऱ्याने हा ट्रॅक्टर तयार केला असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे.

या शेतकऱ्याने तयार केलेला ट्रॅक्टर इतका प्रसिद्ध होता आहे की त्याला चक्क ट्रॅक्टर तयार करण्यासाठी आता ऑर्डर देखील मिळत आहे. हा व्हिडिओ एका ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून देशभरातील नेटकरी या शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणावर कौतुक करत आहेत. आपल्याकडे ट्रॅक्टर घ्यायला पैसे नाहीत म्हणून हार न मानता काहीतरी वेगळ्या पद्धतीने मार्ग शोधून जुगाडू ट्रॅक्टर  या शेतकऱ्याने तयार केले व त्यामुळे या शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts