Exclusive

भावांनो! तुमच्या लाडलीचे असेल ‘सुकन्या समृद्धी’मध्ये खाते तर या कालावधीपर्यंत कराव लागेल ‘हे’ काम, नाहीतर खाते होईल फ्रिज

  पालकांना आपल्या मुला मुलींचे भविष्य उज्ज्वल राहावे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्या अनुषंगाने मुला मुलींच्या शिक्षणाकरिता तसेच भविष्यातील आवश्यक बाबींकरिता आर्थिक तरतुदी केल्या जातात. जर आपण आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर अनेक प्रकारच्या पॉलिसीज देखील असून यामध्ये अनेक पालक गुंतवणूक करतात.

परंतु जर आपण सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेचा विचार केला तर ही मुलींच्या उज्वल  भविष्याकरिता असलेली एक महत्त्वाची योजना असून या अंतर्गत मुलीच्या नावे खाते उघडले जाते व यामध्ये प्रत्येक वर्षाला एक निश्चित रक्कम जमा केली जाते. या योजनेची मदत मुलीच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्नकार्य इत्यादीसाठी खर्च  करण्याकरिता कामी येते.

ही योजना अतिशय महत्त्वाची योजना असून देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या योजनेतून मुलींच्या भविष्याकरिता यामध्ये अनेक पालक गुंतवणूक करतात. परंतु या योजनेच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट असून जे प्रत्येक पालकाला माहिती असणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून या लेखांमध्ये यासंबंधीचे संपूर्ण माहिती दिलेली आहे.

 सुकन्या खात्याशी पॅन आणि आधार लिंक करणे गरजेचे

यासंबंधीचे सविस्तर वृत्त असे की, मुलींचे उज्वल भविष्य घडावे व त्यांना लागणारा शिक्षण किंवा लग्नासाठीचा खर्च  पूर्ण करता यावा याकरिता सरकारच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली असून या अंतर्गत मुलीचे नावे खाते उघडून दरवर्षी त्यामध्ये एक ठराविक रक्कम जमा केली जाते.

जेव्हा मुलगी मॅच्युरिटी मध्ये येते तेव्हा तिला मोठ्या व्याजासह परताव्याच्या स्वरूपात रक्कम दिली जाते. सरकारची ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेचे जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकरिता आता एक महत्त्वाची माहिती असून ती म्हणजे  याकरिता आता पॅन आणि आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला असून ज्या पालकांनी अजून पर्यंत सुकन्या समृद्धीचे खाते पॅन आणि आधारशी लिंक केलेले नसेल तर अशा गुंतवणूकदारांनी ते करून घेणे गरजेचे आहे. नाहीतर  सुकन्या समृद्धीचे खाते फ्रिज केले जाऊ शकते.

 काय आहे अर्थ मंत्रालयाची

नोटिफिकेशन?

या अनुषंगाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी केली असून त्यानुसार सुकन्या समृद्धी मध्ये गुंतवणूक करण्याकरिता खाते सुरू करताना पॅन किंवा फॉर्म 60 जमा करणे गरजेचे आहे. परंतु खाते सुरू करताना जर पॅन कार्ड दिले गेले नसेल तर यापैकी कोणत्याही एका प्रकरणांमध्ये दोन महिन्याच्या आत आधार नंबर देणे गरजेचे आहे.

ज्या पालकांनी किंवा गुंतवणूकदारांनी 31 मार्चनंतर या योजनेत खाते उघडले आहे अशा खातेधारकांना आधार आणि पॅन संबंधित पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये दाखल करावा लागेल व याची अखेरची तारीख सप्टेंबर 2023 आहे. तसेच या नोटिफिकेशन मध्ये एक महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे

ती म्हणजे गुंतवणूकदाराच्या सुकन्या समृद्धी खात्यामध्ये जर कोणत्याही वेळेला अकाउंट मध्ये जमा केलेली रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा कोणत्याही आर्थिक वर्षांमध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा असतील किंवा वर्षातील कोणत्याही महिन्यामध्ये खात्यात जमा केली जाणारी रक्कम जर दहा हजार पेक्षा जास्त असेल तर अशा परिस्थितीत पॅन दोन महिन्याच्या आत दिले गेले नसेल तर पॅन नंबर उपलब्ध होईपर्यंत संबंधित अकाऊंट फ्रीज केले जाऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी यासंबंधी असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts