Exclusive

Mhada News : म्हाडाच्या कोकण मंडळाची निघणार 4000 घरांची लॉटरी! केवळ 5 हजारात मिळेल घर…..

Mhada News : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थातच म्हाडा आणि सिडको या दोन गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना मुंबई आणि पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरांमध्ये स्वस्तामध्ये हक्काचे घर मिळणे शक्य होते. या अंतर्गत लॉटरीच्या माध्यमातून घरांसाठी सोडत काढण्यात येते हे आपल्याला माहिती आहे. याकरिता अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या प्रोसेस मधून जावे लागते व शेवटी या घरांसाठी सोडत काढण्यात येते.

अशा पद्धतीची साधारणपणे ही प्रोसेस असते. म्हाडाच्या माध्यमातून समाजातील अत्यल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय गटातील नागरिकांना देखील हक्काचे घर मिळते. याच म्हाडाच्या जर कोकण मंडळाच्या लॉटरीचा विचार केला तर कोकण मंडळाने लॉटरीच्या करिता जी काही रक्कम जमा करावी लागते ती आता अर्ध्यावर आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव देखील म्हाडाच्या उपाध्यक्ष यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. जर कोकण मंडळाने पाठवलेला हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर आता घरांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना खूप कमीत कमी किमतीमध्ये या सोडतीत सहभाग नोंदवता येणार आहे.

कोकण मंडळाच्या चार हजार घरांसाठी निघणार लॉटरी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून लॉटरीत सहभाग नोंदवण्यासाठी जी काही अनामत रक्कम जमा भरावी लागते ते आता निम्म्यावर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून नुकताच हा प्रस्ताव म्हाडाच्या उपाध्यक्ष यांच्याकडे मंजुरी करिता पाठवण्यात आलेला आहे.

जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर नागरिकांना निम्मे किमतीमध्ये अनामत रक्कम भरता येणार असून या माध्यमातून सोडतीत स्वतःचा सहभाग नोंदवता येणार आहे. सध्या जर आपण कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये  सहभाग नोंदवण्यासाठी भरायचे असलेल्या अनामत रकमेचा विचार केला तर तो साधारणपणे, निम्न वर्गाकरिता वीस हजार रुपये,

मध्यमवर्गीयांसाठी 30 हजार रुपये आणि उच्च वर्गीयांसाठी चाळीस हजार रुपये अशाप्रकारे अनामत रक्कम भरावी लागते. परंतु कोकण मंडळाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर वरील अनामत रक्कम ही निम्मी होणार असून यामुळे जास्तीत जास्त अर्जदारांना लॉटरीत सहभाग नोंदवता येणार आहे.

म्हाडाच्या या निर्णया मागील कारणे

म्हाडाच्या माध्यमातून घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता एकच अर्जदार एकापेक्षा जास्त घरांसाठी अर्ज करायचे. परंतु बऱ्याचदा अनामत रक्कम जास्त असल्यामुळे  एकापेक्षा जास्त अर्ज केल्यानंतर अनामत रक्कम भरणे कठीण जायचे. याच समस्येचा विचार केला तर यामुळे मुंबई मंडळाची जी काही लॉटरी निघाली यामध्ये एकूण चार हजार 82 घरांची सोडत होती. या लॉटरी करिता अडीच ते तीन लाख अर्ज येतील अशी एक अपेक्षा म्हाडाला होती.

परंतु अनामत रक्कम जास्त असल्यामुळे या लॉटरीसाठी फक्त एक लाख 45 हजार 849 जणांनी  नोंदणी केली होती व यातल्या फक्त एक लाख 22 हजार 319 जणांनी आवश्यक अनामत रक्कम भरली होती. जेव्हा या सर्व प्रक्रिया पार पडल्या त्यानंतर या घरांसाठी  फक्त एक लाख वीस हजार 144 अर्जदारांमध्येच सोडती करिता स्पर्धा होणार आहे. परंतु आता ठेवीची म्हणजेच अनामत रक्कम जर कमी झाली तर अर्जदार एकापेक्षा जास्त घरांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

त्याचा फायदा आता अर्जदारांना म्हाडाच्या कोकण मंडळाच्या चार हजार घरांसाठी जी काही लॉटरी निघणार आहे त्यात होऊ शकतो. या सोडतीची आता जाहिरात करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

या लॉटरीच्या माध्यमातून ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार आणि मीरा रोड इत्यादी भागातील घरे देखील असणार आहेत. यासाठी म्हाडाचा जो काही प्रस्ताव मंजुरी करिता पाठवलेला आहे तो प्रस्ताव मंजूर होतास या लॉटरीच्या संपूर्ण तारखा या जाहीर केल्या जाणार होता.

प्रस्ताव मंजूर झाल्यावर अनामत रक्कम अशा पद्धतीने राहतील

अत्यल्प गटाकरिता अगोदर दहा हजार रुपये अनामत रक्कम होती परंतु आता हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पाच हजार रुपये अनामत रक्कम भरून सहभाग नोंदवता येईल. त्यासोबतच अल्प गटासाठी 20000 ऐवजी 10,000, मध्यमवर्गीयांकरिता तीस हजार ऐवजी 15000 आणि उच्च गटाकरिता 40000 ऐवजी 20000 अशाप्रकारे आता अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts