कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी संघटना असून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यांचे देखरेखीचे काम या संस्थेकडे आहे. नुकतीच ईपीएफओ च्या माध्यमातून पीएफ खातेदारांना मिळणाऱ्या व्याजाच्या दरात देखील वाढ करण्यात आलेली आहे व त्याचा फायदा लवकरच पीएफ खातेदारांना मिळणार असण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एक्सचेंज ट्रेडर फंड अर्थात ईटीएफ मधून जे काही उत्पन्न मिळते ते शेअर बाजारामध्ये पुन्हा गुंतवण्याची प्लॅनिंग करत आहे याकरिता अर्थमंत्रालयाशी चर्चा देखील सुरू करण्यात आली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने याबाबतचे महत्त्वाची माहिती दिली आहे. अहवालाचा विचार केला तर बाजारामध्ये जी काही अस्थिरता आहे त्याचा फायदा घेऊन परतावा वाढवा याकरिता ईपीएफओकडून ही प्लॅनिंग केली जात आहे.
शेअर बाजारामध्ये ईपीएफओ करणार गुंतवणूक
बाजारातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन परतावा वाढावा याकरिता ईपीएफओ कडून हा प्रयत्न केला जाणार असून मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सीबीटी अर्थात केंद्रीय विश्वस्त मंडळाने झालेल्या बैठकीमध्ये या हालचालींना मान्यता दिली होती. या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना उत्पन्नाच्या पाच ते पंधरा टक्क्यांपर्यंतचे स्टॉक मार्केटमध्ये ईटीएफच्या माध्यमातून गुंतवण्याची शक्यता आहे.
यामागे ईपीएफओचे काय आहे नियोजन?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना दैनंदिन युनिट्स म्हणजेच ईटीएफ रीडिंग करण्याची परवानगी घेते. ज्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा शेअर बाजारातून पैसे काढता येतात व ठराविक कालावधीनंतर हे पैसे काढण्याची परवानगी आहे. सध्या सेन्सेक्सच्या सरासरी चार वर्षाच्या परताव्याच्या तुलनेमध्ये ईटीएफ चा परतावा बेंच मार्क आहे. परंतु कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने हा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
ईटीएफ म्हणजे नेमके काय?
एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे इतर गुंतवणुकीच्या पर्यायांसह स्टॉक, बॉण्ड, चलने तसेच निर्देशांक आणि कमोडिटी सह विविध सिक्युरिटी चे बंडल आहे. ईपीएफ चा उद्देश गुंतवणूकदारांना कमीत कमी किमतीत एकापेक्षा जास्त मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देणे असा आहे.
हा फंड म्युच्युअल फंडा सारखाच असतो. परंतु म्युच्युअल फंडाच्या व्यतिरिक्त ट्रेडिंग कालावधी दरम्यान ईटीएफ कधीही विकला जाणे शक्य आहे. ईपीएफओ ऑगस्ट 2005 मध्ये ईटीएफमध्ये गुंतवणूक करत असून आतापर्यंत 1.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ईपीएफओने ईटीएफमध्ये केली आहे.