सध्या टोमॅटोमुळे लखपती आणि करोडपती झालेल्या शेतकऱ्यांच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रांच्या रकान्यांमध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पहात आणि वाचत आहोत. टोमॅटोचे दर या हंगामामध्ये प्रचंड प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला परंतु शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होताना दिसून येत असून खरंच शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळाल्याचे सध्या चित्र आहे.
तब्बल दोन हजार रुपये प्रति क्रेट या दराने टोमॅटो विकले जात आहे. अनेक शेतकऱ्यांवर वर्षानुवर्षीचे कर्ज असेल ते देखील मिटले असून बरेच शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. अगदी याच पद्धतीची एक बातमी कर्नाटक राज्यातून समोर आली असून ते सोशल मीडियावर देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे.
या ठिकाणी देखील एक तरुणाने टोमॅटो लागवड केली होती व टोमॅटोने त्याला आता लखपती तर बनवले व या पैशातून त्याने एसयुव्ही कार देखील खरेदी केली आहे. परंतु या तरुणाने एक खंत व्यक्त केली आहे व याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
टोमॅटो विकून घेतली एसयूव्ही कार परंतु व्यक्त केली ही खंत
कर्नाटक राज्यातील चामराजनगर हा तालुका असून या तालुक्यातील लक्ष्मीपूर या गावचा रहिवासी असलेल्या राजेश यांनी 12 एकर शेतीमध्ये टोमॅटोची लागवड केली होती व या टोमॅटो लागवडीतुन त्यांना तब्बल 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मग राजेश यांनी या मिळालेल्या पैशातून चक्क एसयुव्ही कार खरेदी केली व एवढेच नाही तर टोमॅटोचे दर असेच राहिले तर काही दिवसांमध्ये राजेश यांची कमाई एक कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता देखील त्यांनी बोलून दाखवली.
याविषयी बोलताना त्यांनी म्हटले की, टोमॅटो विक्रीतुन आता माझ्याकडे पैसे आले आहेत त्यामुळे मी आता चांगले आणि सुखी आयुष्य जगू शकतो. परंतु अजून देखील मी लग्नासाठी मुलीच्या शोधात असून आता याकरिता मला जास्त त्रास होणार नाही. परंतु याआधी मी लग्नासाठी मुलगी शोधत होतो परंतु सरकारी नोकरी नसल्यामुळे नाकारण्यात आल्याची खंत देखील त्यांनी बोलताना व्यक्त केली.
त्यांनी म्हटले की, अनेक मुली लग्नासाठी बघत असताना त्या मुलीच्या कुटुंबातील बहुतेक सदस्यांची अपेक्षा होती की मुलगा हा सरकारी किंवा एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी करणारा हवा व अशा मुलाशीच मुलीचे लग्न करायचे आहे. परंतु राजेश यांनी म्हटले की जर शेती चांगल्या पद्धतीने व नियोजनाने केली तर तुम्ही सरकारी नोकरीवाल्यांपेक्षा देखील चांगला पैसा मिळवू शकतात पुढे व पुढे त्यांनी म्हटले की आता ते एसयुव्ही कार मधून वधू शोधणार आहेत.