Exclusive

खुशखबर ! नवी मुंबईमध्ये प्रति तिरुपती बालाजीचे मंदिर बांधले जाणार, ‘या’ तारखेला होणार भूमिपूजन, मुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित

Tirupati Temple New Mumbai : महाराष्ट्रातील स्वामी व्यंकटेश्वर भगवान यांच्या भक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे व्यंकटेश्वर भगवान यांच्या तिरुपती बालाजीच्या मंदिराचे प्रतिरूप आपल्या नवी मुंबईमध्ये उभारले जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तिरुपती तिरुमाला मंदिर व्यवस्थापनानं प्रति तिरुपती बालाजीचे मंदिर नवी मुंबईमध्ये उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. यासाठी दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2021 मध्ये मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने तिरुपती तिरूमला मंदिर व्यवस्थापनाचा हा प्रस्ताव मान्य केला होता. यानुसार तत्कालीन ठाकरे सरकारने नवी मुंबईतील उळवे नोड येथील दहा एकर जमीन या प्रतिकृती तिरुपती बालाजी मंदिरासाठी देण्याचा निर्णय घेतला होता.

एप्रिल 2022 मधील एका महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यात सत्ता बदल झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकार कोसळले. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर या निर्णयावर काहीच हालचाल झाली नाही. मात्र आता गेल्या ठाकरे सरकारचा निर्णय वर्तमान शिंदे सरकारने कायम ठेवला आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! राज्य कर्मचारी पुन्हा आंदोलन पुकारणार; आता काय आहे मागणी? वाचा

शिंदे सरकारने प्रति तिरुपती बालाजी मंदिरासाठी नवी मुंबई मधील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ असलेली 10 एकर जागा दिली आहे. ही जागा जवळपास 500 कोटी रुपये किमतीची आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानचे प्रमुख वाय.वी. रेड्डी यांनी नवी मुंबईमध्ये प्रति तिरुपती बालाजी मंदिर उभारणीसाठी राज्य शासनाने जागा दिल्याचे स्पष्ट केले असून या मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासंदर्भात देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.

रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईमध्ये तिरुपती तिरुमाला संस्थानच्या वतीने प्रति बालाजीचे मंदिर विकसित केले जाणार असून याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढल्या महिन्यात सात जून 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

तसेच या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

निश्चितच, राज्य शासनाने प्रति तिरुपती बालाजीच्या मंदिरासाठी नवी मुंबई मधील जागा दिली असल्याने आता या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

यामुळे आता राज्यातील भाविकांना भगवान वेंकटेश्वरच्या दर्शनासाठी जर तिरुपतीला जाणे शक्य झाले नाही तर नवी मुंबई मध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. यामुळे भाविकांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आणि तिरुपती तिरुमाला संस्थानच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘त्या’ 37 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, राज्य शासनाचा जीआर जारी; केव्हा होणार गणवेश वाटप?

मंदिर उभारणीसाठी किती खर्च लागणार?

नवी मुंबई मधील या प्रती तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या उभारणीसाठी 70 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा सर्व खर्च मंदिर उभारणीसाठी दात्यांकडून आलेल्या आणि भक्तांकडून आलेल्या देणगीतून केला जाणार आहे.

एकंदरीत आता 500 कोटी रुपयांची जागा या मंदिरासाठी मिळाली असल्याने या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच हे मंदिर भाविकांसाठी बांधून तयार केले जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील स्वामी व्यंकटेश्वरच्या भक्तांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी राहणार आहे.

हे पण वाचा :- कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायच का? मग ‘ही’ कागदपत्रे जोडा अन ‘इथ’ करा अर्ज, फक्त 8 दिवसांत मिळणार प्रमाणपत्र

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts