Tourist Place: ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सगळीकडे आता निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले निसर्गाचे सानिध्य व मोठमोठे डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या घाटमाथ्यावरील टेकड्या आणि इतर भाग तसेच खळाळून वाहणारे धबधबे आणि नद्यांचे प्रवाह पाहून मन एकदम प्रफुल्लित होते.
त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मनसोक्त फिरण्यासाठी आणि निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्याकरिता छोटीशी ट्रीप प्लान करतात. यामध्ये कधी कधी मित्रांसोबत तर कधी कधी कुटुंबासोबत अशा ट्रीप प्लान केल्या जातात.
महाराष्ट्र मध्ये अशी अनेक ठिकाणी आहेत की जी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप अशी निसर्गाने भरभरून आणि सौंदर्याने ओतप्रोत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण विचार केला तर मुंबईपासून दीड ते दोन तासाच्या अंतरावर असलेले माथेरान हे देखील एक पर्यटनासाठी उत्तम असे ठिकाण असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भेट देऊन तुम्ही मनसोक्त असा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे आपण या लेखांमध्ये माथेरान या छोट्याशा हिल स्टेशन बद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत.
माथेरान एक निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण ठिकाण
माथेरान यांनी निसर्गाने नटलेले असे ठिकाण असून या ठिकाणी 38 असे व्हू पॉईंट आहे. यामध्ये सुंदर असे धबधबे तसेच असलेले निसर्गरम्य वातावरण, सनसेट तसेच सनराइज् पॉईंट, ट्रेकिंग साठी उत्तम ठिकाणे तसेच हिरवीगार शालू पांगरलेली जंगले इत्यादीमुळे माथेरानला ट्रिप प्लॅन केली तर तुम्हाला निसर्गाचा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आनंद घेता येईल. या ठिकाणी असलेला पॅनोरमा पॉईंट तसेच लुईसा पॉईंट, मंकी पॉईंट, इको पॉईंट तसेच शारलोट लेक इत्यादी ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर नक्कीच पावसाळ्यात फिरण्याची योजना सफल होईल.
माथेरान मधील पाहता येण्यासारखी काही महत्त्वाचे ठिकाणे
1- चंदेरी ट्रॅक– चंदेरी ट्रेक हे माथेरान मधील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध असे आकर्षणाचे स्थळ असून या ठिकाणी चंदेरी लेण्या आहेत व हे 800 मीटर उंचीपर्यंत पसरलेले एक सुंदर असे ठिकाण आहे. जर तुम्ही बदलापूर पासून कर्जतला जाता तेव्हा चंदेरी लेणी तुम्हाला रस्त्यात लागतात.
जर तुम्हाला माथेरान या ठिकाणी भेट देऊन ट्रेकिंग करायचा विचार असेल तर तुम्ही चंदेरी लेणी हा पर्याय निवडू शकता. जेव्हा तुम्ही या ठिकाणहून ट्रेकिंग करता तेव्हा तुम्हाला या ठिकाणी गुहांमधून दिसणारे सुंदर दृश्य नक्कीच मनाला मोहीत करते. जुलै ते ऑक्टोबर हा कालावधी याच ठिकाणी ट्रेकिंग साठी योग्य आहे.
2- शार्लोट लेक– हे देखील माथेरान मधील प्रमुख ठिकाण असून जर तुम्हाला शांत ठिकाणाच्या शोधात असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माथेरान रेल्वे स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला भेट देऊन तुम्ही नक्कीच पावसाळ्याच्या दिवसातला आनंद द्विगुणित करू शकता. हा पन्नास फुटाचा तलाव असून या दिवसांमध्ये पाण्याने संपूर्णपणे भरलेला असतो. तेव्हा तुम्ही या तलावाच्या किनाऱ्याला बसता तेव्हा तुम्हाला अनेक मनाला भुरळ घालतील असे दृश्य अनुभवायला मिळतात.
3- लूईसा पॉईंट– माथेरान मध्ये जितके व्हिव पॉईंट आहे त्यापैकी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आणि आकर्षक असा आहे. तुम्हाला दिवसा पॉईंट ला जायचे असेल तर मार्केट पासून दीड किलोमीटर अंतरावर या ठिकाणी तुम्हाला पायी चालत जावे लागते. या पॉईंटवरून तुम्हाला आजूबाजूला असलेले किल्ले तसेच धबधबे व बाग बगीचे यांचे सौंदर्य न्याहाळता येते. या पॉईंटवरून तुम्हाला विशाळगड किल्ल्याचे दर्शन होते. वर्षातील कोणत्याही वेळी तुम्ही या ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात.
4- नेरळ–माथेरान टॉय ट्रेन– माथेरानला भेट दिल्यानंतर तुम्हाला जर सफर करायचे असेल तर नेरळ माथेरान टॉय ट्रेन त्यासाठी एक खूप चांगला असा पर्याय आहे. माथेरानला भेट दिल्यानंतर या ट्रेनने प्रवास करणे खूप महत्त्वाचे असून त्याशिवाय तुमची माथेरानची सफर पूर्ण होणारच नाही.
या रेल्वेच्या साह्याने तुम्ही 20 किलोमीटरच्या अंतर पार करू शकतात व या रेल्वेमधून प्रवास करताना आजूबाजूला असलेल्या सुंदर टेकड्यांचे आणि जंगलांचे दृश्य तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. लहान मुलांसोबत या ट्रेनमधून प्रवास करणे म्हणजे स्वर्गातील आनंद घेण्यासारखे आहे. विशेष म्हणजे नेरळ माथेरान टॉय ट्रेनचा समावेश हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत देखील करण्यात आला आहे.
5- दोधनी धबधबा– दोधनी धबधबा हा माथेरान या ठिकाणचा एक चांगला पर्यटक पॉईंट असून पनवेल वरून वरून तुम्हाला बाय रोड या ठिकाणी जाता येते. या ठिकाणच्या रॅपलिंग तुमच्या मनाला नक्कीच मोहित करते. जर तुम्हाला सहाशी पर्यटनाची हौस असेल तर या ठिकाणीउतारावरून खाली कोसळणाऱ्या धबधब्याचा अनुभव तुमच्या मनाला नक्कीच मोहित करेल.