आता कृषी संबंधित असलेल्या बऱ्याच बाबी या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात असून याला आता पीक पाहणी देखील अपवाद नाही. आता शेतकरी बंधूंना स्वतः हातातील मोबाईलच्या साह्याने ई पीक पाहणी करता येते. मोबाईलच्या साह्याने एप्लीकेशन चा वापर करून शेतकऱ्यांना पीक पाहणी करता येते परंतु पीक पाहणी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर त्या पिकांची नोंद होणे तितकेच महत्त्वाचे असते. म्हणजेच तुम्ही केलेली पिक पाहणी यशस्वीरित्या झालेली आहे का हे यातून आपल्याला कळते.
कारण बऱ्याच दृष्टिकोनातून ई-पीक पाहणी यशस्वी होणे हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण आता शासनाकडून मिळणारे अनुदान असो किंवा नुकसान भरपाई इत्यादी बाबींकरिता ई पीक पाहणी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण केलेली पीक पाहणी यशस्वी झाली आहे की नाही हे तुम्हाला कळणे देखील तितकेच गरजेचे आहे. तुम्ही केलेली ई पिक पाहण्याची स्टेटस किंवा सद्यस्थिती तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून ई पीक पाहणी एप्लीकेशन चा वापरातून ते सहजपणे पाहू शकतात.
अशा पद्धतीने चेक करा तुमच्या ई पीक पाहणीचे स्टेटस
1- सर्वप्रथम तुम्हाला पिकप पाहणी व्हर्जन दोन हे एप्लीकेशन मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करणे गरजेचे आहे.
2- त्यानंतर ई पीक पाहणी अँप उघडायचे आहे व महसूल विभाग निवडायचा आहे.
3- महसूल विभागाची निवड केल्यानंतर ई पीक पाहणी केली असल्यामुळे खातेदार
निवड असा पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला येईल.4- त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे.
5- खाते क्रमांक टाकल्यानंतर सांकेतांक क्रमांक टाकायचा आहे.
6- त्यानंतर गावाचे खातेदारांचे पीक पाहणी हा पर्याय निवडायचा आहे.
7- साहजिकच हा पर्याय निवडल्यानंतर गावातील खातेदारांच्या यादीमध्ये तुमचे नाव हिरव्या रंगात दिसेल. गावाचे खातेदारांची पिक पाहणी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सगळ्या गावातील खातेदारांची नावे दिसतात.
8- यामध्ये ज्या नावासमोर हिरवा रंग असतो त्या शेतकऱ्यांची संपूर्ण ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे व ती यशस्वी झालेली आहे असं त्याचा अर्थ होतो.
9- त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक डोळा दिसतो या डोळ्यासमोर असलेल्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या शेतात कोणकोणते पीक आहे व कोणत्या तारखेला ई पीक पाहणी केलेली आहे हे कळते.