Exclusive

Useful Tricks : घरातील इलेक्ट्रिक स्विच काळे पडले आहेत का? आता नाही काळजी! हा जुगाड वापरा आणि करा स्वच्छ

आपल्यापैकी बरेच जण नवीन घर बांधतात आणि त्या घरामध्ये उत्तम अशा प्रतीची इलेक्ट्रिक फिटिंग केली जाते. जेव्हा आपण घरामध्ये फिटिंग करतो तेव्हा घरातील इलेक्ट्रिक उपकरणांकरिता प्रत्येक रूममध्ये इलेक्ट्रिक स्विच अर्थात पॉईंट काढतो. बरेच जण अतिशय महागडे असे इलेक्ट्रिक स्विच किंवा फिटिंग साठी लागणारे इलेक्ट्रिक मटेरियल वापरतात. कधी सफेद रंगाचे तर कधी वेगळ्या रंगाचे असे आकर्षक इलेक्ट्रिक स्वीचचा वापर घरामध्ये केला जातो.

बऱ्याचदा असे आकर्षक डिझाईन आणि वेगवेगळ्या रंगातील इलेक्ट्रिक स्विचमुळे घरातील सौंदर्यात देखील भर पडते. परंतु कालांतराने काही दिवस झाल्यानंतर घरात उडणारी धूळ किंवा इतर बाबींमुळे आकर्षक दिसणारे हे इलेक्ट्रिक स्विच खराब होतात किंवा त्याच्यावर काळे डाग किंवा काळा रंग चढतो. त्यानंतर बरेच जण हे बोर्ड स्वच्छ करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे पर्याय करून पाहतात.परंतु तरीदेखील असे इलेक्ट्रिक स्विच व्यवस्थित साफ होत नाहीत. त्यामुळे आपण या लेखांमध्ये काही महत्त्वाचे ट्रिक बघणार आहोत ज्यामुळे ताबडतोब इलेक्ट्रिक बोर्ड स्वच्छ होतील.

 वापरा हा जुगाड आणि करा स्विच बोर्ड स्वच्छ

आपल्यापैकी बरेच जण घराच्या स्वच्छतेकडे खूप लक्ष पुरवतात परंतु घरातील छोट्या-मोठ्या बाबी जसे की इलेक्ट्रिक स्विच बोर्ड सारख्या छोट्या गोष्टींवर आपण लक्ष देत नाही. पुढे त्या कालांतराने खराब होतात व काळे दिसायला लागतात. त्यानंतर आपण काहीतरी उपाय करून ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हवे तसे ते स्वच्छ होत नाहीत. याकरिताच आपण या लेखांमध्ये जर स्विच बोर्ड काळा पडला तर या महत्त्वाच्या ट्रिक वापरून तुम्ही घरातील इलेक्ट्रिक बोर्ड स्वच्छ करू शकतात.

 1-बेकिंग सोड्याचा वापर याकरिता तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. प्रत्येकाच्या घरामध्ये बेकिंग सोडा हा असतो. बेकिंग सोड्याचा सहाय्याने स्विच स्वच्छ करण्याकरिता अगोदर लिंबू आणि एक चमचा बेकिंग सोडा याचा वापर करणे गरजेचे असून या माध्यमातून तुम्ही काळे पडलेले इलेक्ट्रिक स्विच चमकवू शकतात. याकरिता लिंबूचे दोन तुकडे करावेत आणि लिंबूच्या एका तुकड्याला बेकिंग सोडा लावून घ्यावा. बेकिंग सोडा लावलेल्या तुकड्याने काळे पडलेले स्वीच बोर्ड व्यवस्थित घासावेत. अशाप्रकारे इलेक्ट्रिक बोर्ड ताबडतोब स्वच्छ होईल.

2- नेल पॉलिश रिमूव्हरच्या साह्याने तसेच घरातील असे काळे पडलेले बोर्ड तुम्ही नेल पॉलिश रिमूव्हरचा वापर करून देखील अगदी स्वच्छ करू शकतात. नेल पॉलिश रिमूव्हर मध्ये ऍसिटोन नावाचे एक केमिकल असते. या केमिकल च्या मदतीने कोणत्याही प्रकारचे डाग काढता येणे शक्य असते.

3- टूथपेस्टचा वापर करून इतकेच नाहीतर तुम्ही आपल्या दैनंदिन वापरातील टूथपेस्टचा वापर करून देखील घरातील काळे पडलेले इलेक्ट्रिक स्विच बोर्ड स्वच्छ करू शकता. कारण टूथपेस्टमध्ये सोडियम बायकार्बोनेट असते व यामुळे कोणतेही डाग अगदी सहजपणे निघू शकतात. त्यामुळे घरातील टूथपेस्ट चा वापर करून तुम्ही काळे पडलेले बोर्ड ताबडतोब स्वच्छ करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts