Exclusive

Vande Bharat Express : पाचवी वंदे भारत धावणार महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरा दरम्यान, पर्यटनाला मिळेल फायदा

Vande Bharat Express :-गतिमान प्रवासाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहेत. आतापर्यंत देशांमध्ये 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेल्या असून त्यातील चार वंदे भारत या महाराष्ट्रात सुरू आहेत.

मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस राज्यातून सुरू आहेत. परंतु लवकरच महाराष्ट्रातून पाचवी आणि तितक्याच महत्त्वाच्या मार्गासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याविषयीचे अपडेट आपण या लेखात बघणार आहोत.

 मुंबईकोल्हापूर दरम्यान धावणार वंदे भारत एक्सप्रेस

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये कोल्हापूरकरा करिता हा दोन महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या असून त्यातील एक म्हणजे कोकण रेल्वेला कनेक्ट असणाऱ्या कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गाचा पीएम गतिशक्ती योजनेच्या अंतर्गत  समावेश केल्यामुळे आता या मार्गाने गती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे व त्यातच दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे कोल्हापूरकरांना लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट देखील मिळणार आहे.

ही राज्यातील पाचवी वंदे भारत एक्सप्रेस असणार असून ती कोल्हापूर ते मुंबई मार्गावर लवकरच धावणार आहे. यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या असून कोल्हापूरकरांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस खूप महत्त्वाची आणि फायद्याची ठरणार आहे. सध्या जर आपण विचार केला तर मुंबई ते कोल्हापूर जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर फक्त एकच गाडी असल्यामुळे प्रवाशांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर खूप दिलासा मिळणार आहे.

 कुठे असतील या वंदे भारत एक्सप्रेसला थांबे?

महाराष्ट्रातील ही पाचवी वंदे भारत एक्सप्रेस असणार असून ही ट्रेन मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान धावणार असून तिला दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज स्टेशनवर थांबा मिळणार आहे. मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान या एक्सप्रेसला प्रवास करायला सात तास इतका वेळ लागणार असून महत्वाचे म्हणजे कोल्हापूर आणि मुंबई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तब्बल चार ते पाच तासांनी कमी होणार आहे.

तसेच आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी या ठिकाणी बारा महिने देखील पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर हे वंदे भारत एक्सप्रेस खूप महत्त्वाची ठरणार आहे.

 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी किती कालावधी लागेल?

सध्या आवश्यक प्रक्रियाकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत परंतु ही वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू होईल याची शक्यता जरा कमी आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तांत्रिक अडचणींचे कारण दिले जात असून साधारणपणे ही वंदे भारत एक्सप्रेस मार्च 2024 नंतर सुरु होऊ शकते अशी देखील माहिती समोर आली आहे. कारण जर आपण या मार्गाचा विचार केला तर यावर रेल्वे मार्गांचा विद्युतीकरण,

काही महत्त्वाच्या तांत्रिक समस्या तसेच पुणे ते मिरज मार्गाचे दुहेरीकरणाचे काम साधारणपणे मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे कोल्हापूर आणि मिरज दरम्यानचा जो काही मार्ग आहे तो सध्या एकेरी आहे. त्यामुळे या अडचणी दूर करूनच वंदे भारत ट्रेन या मार्गावर धावू शकणार आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही ट्रेन खूप महत्त्वाची असून मुंबईहून कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद देखील चांगला राहण्याची शक्यता आहे.

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts