Exclusive

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसनंतर महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या मार्गांवरही सुरु होणार Vande Bharat Train, वाचा….

Vande Bharat Express : सध्या राज्यात मुंबई-गोवा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या विशेषता कोकणवासीयांना या गाडी संदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

अशातच मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे चित्र आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू झाला आहे.

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे. यासाठी पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देखील लिहिले आहे. 

हे पण वाचा :- दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! राज्याच्या ‘या’ विभागात निघाली 512 रिक्त पदांसाठी मोठी भरती, आजच करा अर्ज

खरतर देशभरातील महत्त्वाची शहरे वंदे भारत एक्सप्रेस ने कनेक्ट केले जात आहेत. प्रामुख्याने तीर्थक्षेत्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वेचा आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन मार्गावर हायस्पीड ट्रेन सुरू केली आहे.

यामुळे शिर्डीला आणि पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांना मोठा फायदा झाला आहे. कोल्हापूर हे देखील राज्यातील एक अति महत्त्वाचे शहर आहे.

कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देखील शिर्डी प्रमाणेच लाखो लोक दरवर्षी येत असतात. त्यामध्ये मुंबईहून येणाऱ्या भाविकांची संख्या देखील लक्षणीय आहे. शिवाय कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या पर्यटकांची आणि प्रवाशांची संख्या अधिक आहे. 

हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय ! महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास मिळणार मुद्रांक शुल्कात मोठी सूट, ‘त्या’ जाचक अटीही झाल्यात रद्द

अशा परिस्थितीत या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी देखील केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मार्गावर सध्या महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोयना एक्सप्रेस या दोन गाड्या सुरू आहेत. शिवाय या दोन गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

म्हणून या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर प्रवाशांची सोय होणार आहे. दरम्यान या पत्रावर अद्याप रेल्वे मंत्रालयाकडून कोणतेच उत्तर मिळालेले नाही. मात्र या मार्गांवर ही ट्रेन सुरु झाली तर या मार्गावरील सर्वच प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! पुण्याहून सुरु होणार ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन, सांगली ते पुणे प्रवास होणार जलद, कसा राहणार रूट, वेळापत्रक, वाचा….

Ajay Patil

Recent Posts