Exclusive

Vande Bharat Train News: आता वंदे भारत ट्रेनमधून झोपून आरामात करता येईल प्रवास! ‘या’ तारखेपासून धावेल स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस

Vande Bharat Train News:- भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेचे सुधारित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि सोयीसुविधा असलेले रूप म्हणजेच वंदे भारत ट्रेन होय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संपूर्ण देशाचा विचार केला तर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला देशांमधून देखील खूप मोठा प्रतिसाद मिळत असून कमीत कमी वेळेमध्ये वंदे भारत एक्सप्रेस खूप लोकप्रिय ट्रेन ठरली आहे.

सध्या भारताचा विचार केला तर 25 ठिकाणी वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रातून जर विचार केला तर सोलापूर मुंबई, शिर्डी साईनगर ते मुंबई,  मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपुर या ठिकाणांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. महाराष्ट्रात देखील खूप चांगला प्रतिसाद वंदेभारत एक्सप्रेसला मिळताना दिसून येत आहे. सध्या जर आपण वंदे भारत ट्रेनचे स्वरूप पाहिले तर ती साधारणपणे आठ ते 16 कोच अर्थात डब्यांची आहे.

काही ठिकाणी आठ डब्यांची वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे तर काही ठिकाणी १६ डब्यांची ट्रेन चालवली जात आहे. सध्या शताब्दी एक्सप्रेसच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवल्या जात असून येणाऱ्या काळात राजधानी एक्सप्रेसच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे रेल्वे मंत्रालयाचे नियोजन आहे. त्यामुळे आता स्लीपर वंदे भारत ट्रेन निर्मिती करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात असून यासंबंधी भारतीय रेल्वे कडून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे.

 या कालावधीपर्यंत धावेल स्लीपर वंदे भारत

याबाबत सविस्तर वृत्त असे की देशामध्ये लवकरच पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे. याबाबतीत  चेन्नई या ठिकाणाच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी चे महाव्यवस्थापक बि.जी.मल्ल्या यांनी सांगितले की वंदे भारतची स्लीपर आवृत्ती या वर्षात लॉन्च केली जाणार असून वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर वंदे मेट्रो देखील याच आर्थिक वर्षात सुरू होणार आहे अशी देखील महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.

सध्या स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार करण्याचे काम सुरू असून मार्च 2024 पर्यंत याची निर्मिती पूर्ण होऊन ती सेवेत येण्याची शक्यता आहे. बारा डब्यांची वंदे मेट्रोची निर्मिती देखील सुरू असून कमी अंतराच्या वाहतुकीसाठी ही महत्त्वाची ठरणार आहे. पहिली वंदे मेट्रो ट्रेन जानेवारी 2024 मध्ये सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये नॉन एसी प्रवाशांकरिता एक ट्रेन 31 ऑक्टोबर पूर्वी सुरू केली जाईल व ही एक पुश पूल ट्रेन आहे त्याच्या दोन्ही बाजूला असेल आणि 22 डबे या ट्रेनला असतील अशी देखील माहिती देण्यात आले आहे.

तसेच स्लीपर वंदे भारत ट्रेनची निर्मिती चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी या ठिकाणी सुरू असून यामध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या टीएमएच ग्रुपचा समावेश आहे. या समूहाने दोनशे पैकी 120 स्लीपर वंदे भारत निर्मिती करिता सर्वात कमी बोली लावली होती. तसेच उरलेले 80 ट्रेन टीटागड वेगन्स आणि भेल यांच्या माध्यमातून तयार केली जाणार आहे.

तयार करण्यात येत असलेल्या या स्लीपर ट्रेनचा वेग प्रती तास 160 किलोमीटर असेल व यामध्ये 11 एसी थ्री टियर, चार एसी टू टीयर आणि फर्स्ट क्लास एसीचा एक कोच असे मिळून 16 कोच असणार आहेत. तसेच आवश्यकता असेल तर या कोचच्या संख्येमध्ये 20 किंवा 24 पर्यंत वाढ करता येऊ शकते.

Ajay Patil

Recent Posts