Exclusive

Voter Id Download: साधी आणि सोपी पद्धत वापरा आणि तुमच्या मोबाईलवर तुमचे मतदार कार्ड डाऊनलोड करा! वाचा प्रोसेस

Voter Id Download:-  भारत हा लोकशाही प्रधान देश असल्यामुळे भारतामध्ये निवडणुकांना खूप महत्त्व असल्याने भारतात लोकांच्या माध्यमातून लोकनियुक्त सरकारची निवड केली जाते. या दृष्टिकोनातून मतदानाचा अधिकार हा खूप महत्त्वपूर्ण असून वयाच्या 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे.

परंतु हा मतदानाचा हक्क पार पाडण्याकरिता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदार ओळखपत्र आवश्यक करण्यात आलेले आहे. तसेच आपण याला मतदार ओळखपत्र म्हणून वापरू शकतो.परंतु तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून देखील आपण मतदान कार्डाचा वापर करू शकतो.

यामध्ये जर आपण पाहिले तर e-EPIC वोटर कार्ड असते व हे मूळ मतदान ओळखपत्राचे एक नॉन एडिटेबल पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट अर्थात पीडीएफ वर्जन आहे. या पीडीएफ व्हर्जनला तुम्ही ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून देखील वापरू शकतात. तुम्हाला लागेल तेव्हा याचा वापर करता यावा याकरिता तुम्ही याला डीजी लॉकर किंवा तुमच्या मोबाईल मध्ये देखील सेव करून ठेवू शकता. त्यामुळे हे वोटर आयडी कार्ड कशा पद्धतीने मोबाईलवर डाऊनलोड करावे? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

e-EPIC वोटर आयडी अशा पद्धतीने करा डाऊनलोड

1- आता सगळ्यात अगोदर तुम्हाला https://voterportal.eci.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.

2- त्यानंतर यावर लॉगिन केल्यानंतर मेन्यू नेवीगेशन मध्ये डाउनलोड e-EPIC हा पर्याय दिसतो.

3- त्यानंतर तुम्हाला फॉर्म 6 वर जाऊन अप्लाय ऑनलाइन फॉर्म रजिस्ट्रेशन ऑफ न्यू वोटर आयडी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

4- त्यानंतर न्यू युजर या पर्यायावर क्लिक करून तेथे तुमचे नाव, वय आणि लिंग इत्यादी माहिती नमूद करावी.

5- त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड वरील पत्ता आणि इतर माहिती द्यावी.

6- त्या ठिकाणी तुम्हाला दोन लोकांची माहिती द्यावी लागेल जे तुम्हाला व्हेरिफाय करू शकतील.

7- संपूर्ण माहिती दिल्यानंतर ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा म्हणून इतर कागदपत्र अपलोड करणे गरजेचे राहील.

8- त्यानंतर तुमचा फोन आणि रजिस्टर असलेल्या ईमेल आयडी वर एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल.

9- या ॲप्लिकेशन नंबरचा वापर तुम्ही तुमच्या वोटर आयडीचे स्टेटस चेक करण्यासाठी करू शकतात.

10- ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मतदान ओळखपत्र डाऊनलोड करू शकतात.

 काय आहेत या e-EPIC मतदार कार्डचे फायदे?

1- हे मतदान कार्ड तुम्ही ओळखपत्र म्हणून वापरू शकतात.

2- हे मतदार कार्ड आपण कुठेही केव्हाही मोबाईल मध्ये दाखवू शकतो.

3- सध्या डिजिटल पद्धतीने विविध योजनांकरता ओळखपत्र अपलोड करावे लागते. अशाप्रसंगी तुम्ही तुमचे हे ई मतदार कार्ड अपलोड करू शकतात.

4- प्रवासामध्ये कुठेही तुम्हाला ते लागले तर तुम्ही पटकन डाऊनलोड करून समोरच्या व्यक्तीला आपली ओळख सुद्धा करू शकतात.

5- तुमचे ओरीजनल मतदार कार्ड हरवले असल्यास तुम्ही तुमचे हे मतदार कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करून ओळखपत्र म्हणून त्याचा वापर करू शकतात.

Ajay Patil

Recent Posts