घरामधील गॅस सिलेंडर बऱ्याचदा अचानक संपते आणि मग ऐनवेळेस खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते. त्यातल्या त्यात गॅस सिलेंडर दिवसा संपला तर ठीक आहे नाहीतर रात्रीच्या वेळेस संपला तर आणखीनच डोक्याला ताप होण्याची शक्यता जास्त असते. त्यातल्या त्यात घरामध्ये डबल सिलेंडर असेल तर चांगली गोष्ट असते. परंतु जर सिंगल सिलेंडर असेल तर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते.
बऱ्याचदा जेव्हा कुठे जाण्याची किंवा काही कामाची गडबड असते तेव्हाच गॅस टाकी संपते हा देखील अनुभव बऱ्याच जणांना आलेला असेल. या पार्श्वभूमीवर जर आपल्याला गॅस सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जर कळले तर किती छान होईल? हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशाप्रसंगी येतो.
परंतु आता काळजी करण्याची गरज नसून या लेखांमध्ये आपण अशी एक टेस्ट पाहणार आहोत की त्या माध्यमातून गॅस संपल्यावर होणारी धावपळ किंवा खोळंबा तुम्हाला थांबवता येईल आणि सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तुम्हाला चटकन कळेल.
ही ट्रिक येईल कामाला
याकरिता एक साधी ट्रिक असून त्यासाठी तुमच्या घरात असणारा टॉवेल तुमच्या कामाला येणार आहे. त्यामध्ये सिम्पल फक्त तुम्हाला टॉवेल ओला करायचा आहे आणि तो गॅस सिलेंडरच्या सभोवती गुंडाळून घ्यायचा आहे. हा ओला टॉवेल सिलेंडरच्या टाकीला गुंडाळल्यानंतर जेव्हा टाकी तुम्हाला ओली झाल्यासारखे वाटेल तेव्हा टॉवेल काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला टाकीचे व्यवस्थित व बारकाईने निरीक्षण करायचे आहे.
टाकीचा जो काही भाग ओला झालेला असतो त्यातील साधारणपणे एक भाग लवकर सुकतो आणि एक भाग जास्त वेळ ओला राहतो म्हणजे सुखण्यासाठी जास्त वेळ घेतो. याच ओला आणि सुका भागामुळे तुम्हाला सिलेंडर मधील गॅसची पातळी ओळखता येते. साध्या शब्दात सांगायचे म्हटले म्हणजे टाकीचा जो भाग लवकर कोरडा झाला आहे तिथे गॅस शिल्लक नाही किंवा तो संपला आहे असे समजावे.
त्यानंतर गॅसचा जो भाग ओला राहतो त्या पातळीपर्यंत गॅस सिलेंडरमध्ये शिल्लक आहे हे समजावे. या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या मार्गाने तुमच्या गॅस सिलेंडर मधील गॅसची पातळी ओळखू शकतात. यामागे एक वैज्ञानिक कारण असून सिलेंडरच्या ज्या भागांमध्ये गॅस आहे तेवढाच भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि तो लवकर सुकत नाही. परंतु ज्या भागामध्ये गॅस संपलेला असतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरमधील गॅसची पातळी ओळखू शकतात व होणाऱ्या त्रासापासून वाचू शकतात.