Heart attack : रस्त्यावर अनेकदा हृदयविकाराचा झटका किंबा अचानक श्वासोच्छ्वास थांबून व्यक्ती खाली कोसळल्यानंतर त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी अँम्बुलन्स बोलवणे अथवा रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरू होते.
मात्र अशावेळी जर ‘सोपीआरबाबतची लोकांमध्ये माहिती असल्यास रुग्णांचा जीव ‘बाचवता येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन इंडियन अँकॅडेमिक ऑफ पिडियाट्रीक मुंबई शाखा आणि जे. जे. रुग्णालयाच्या पिडियाट्रीक्स विभागाने एकत्र येत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह डॉक्टर्स, पोलीस, आया बाई आणि वॉर्ड बॉय यांना सीपीआरचे मोफत प्रशिक्षण दिले, जवळपास २०० हून अधिक कर्मचारी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.
हदयव्िकाराचा झटका किंवा अचानक श्वासोच्छ्वास थांबलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी सुरुवातीचे काही मिनिट्स महत्त्वाचे असतात. म्हणून तातडीचा उपाय म्हणून ‘कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) महत्त्वाचे असते, असे जे. जे. रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा प्राध्यापक ब विभागप्रमुख डॉ. बेला वर्मा यांनी सांगितले. २०० हून अधिक कर्मचारी या प्रशिक्षणाला उपस्थित होते. यात परिचारिका, निवासी डॉक्टर, वॉर्ड बॉय, आया, सुरक्षा रक्षक, पीडब्लूडी, इलेक्ट्िक विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. प्रौढ मॅनिक्विन्सवर प्रशिक्षण दिले गेले. प्रत्येकाने स्वतःहून प्रशिक्षण घेतले.
बदलती जीवनशैली, जेवणाच्या चुकीच्या वेळा, झोपेचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. दर लाख लोकसंख्येमागे ४८५० लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराच्या झटक्याने दर सेकंदाला ११२ लोकांचा मृत्यू होतो. तर भारताची लोकसंख्या जगातील सर्वात जास्त असल्याने आपेक्षित आकडे अधिक असू शकतात.
रस्त्याने चालता चालता नागरिकांना हृदयविकाराचे झटके येतात. अशावेळी संबंधित व्यक्तीचे हृदय धडधडणे किंवा श्वास घेणे थांबते. अशा व्यक्तीला जीवन वाचवणारे तंत्र म्हणून ओळख असलेले सीपीआर दिल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता असते. व्यक्तीच्या हृदयाची घडघड अचानक थांबते, त्यावेळी त्या व्यक्तीला वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत त्याच्या शरीरात विशेषतः मेंदू आणि हृदयामध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा कृत्रिमरीत्या पुरवठा करण्यासाठी छाती दाबणे आणि तोंडाद्वारे श्वासोच्छ्वास दिला जातो. श्वासामुळे फुफ्फुस आणि रक्तप्रबाहाला ऑक्सिजनचा पुरबठा होतो. मेंदू आणि हदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांना डिफित्रिलेशन, औषधे आणि व्हेंटिलेशन यासारखी वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत ते कार्यरत ठेवण्यासाठी सीपीआरची मोठी मदत होते.
सीपीआर कसे वापरावे?
सीपीआर तंत्र कसे वापरावे याचे ज्ञान असलेल्या प्रशिक्षित व्यावसायिकांद्वारे किंवा सामान्य लोकाद्वारे सीपीआर केले जाऊ शकतं. सीपीआर या तंत्राचे ज्ञान फक्त डॉक्टरांनाच माहिती हवे, असे काहीही नाही. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती, निम्न वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीबरोबरच कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती हे तंत्र आत्मसात करू शकते.