Health News : देशातील ३८ टक्के लोकांना ‘नॉन अल्कोहोलिक ‘फॅटी लिव्हर’ विकाराने ग्रासले आहे. म्हणजेच मद्यपान न करणाऱ्यांना देखील हा आजार होत असल्याचे ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सने केलेल्या एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. अभ्यासानुसार भारतातील हा आजार फक्त प्रौढांपुरता मर्यादित नाही, तर जवळपास ३५ टक्के मुलांनाही याचा त्रास होतो.
या अहवालामध्ये भारतातील नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोगावरील विविध प्रकाशित अहवालांचे विश्लेषण करण्यात आले आहे. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर विकाराचे अनेकदा निदान होत नाही, कारण त्याचे प्रारंभिक टप्पे लक्षणे नसलेले असतात.
परंतु काही रुग्णांमध्ये तो गंभीर यकृत रोग म्हणून होऊ शकतो, असे या अहवालामध्ये म्हटले आहे. भारतात फॅटी लिव्हरचे एक सामान्य कारण म्हणजे मद्यसेवन. मद्यपानामुळे यकृताचे गंभीर नुकसान होण्याची बहुतेक प्रकरणे होतात. अति गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तर त्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते.
‘फॅटी लिव्हर’ च्या उपचारासाठी सध्या कोणतेही मान्यताप्राप्त औषध नाही, परंतु हा आजार बरा होऊ शकतो, या जीवघेण्या आजारापासून दूर राहण्याचा एकमेव उपाय म्हणजे दारूचे सेवन टाळणे, कारण कोणतीही दारू यकृतासाठी चांगली नसते
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे काय ?
या आजारात लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. हा आजार मद्यपान न करणाऱ्यांमध्ये आढळतो, म्हणूनच याला नॉन-अल्कोहोलिक म्हणतात. कधी कधी दारू पिणाऱ्यांनाही हा आजार जडतो. त्यानंतर व्यक्तीच्या यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे गॅस्ट्रोशी संबंधित अनेक प्रकारचे आजार सुरू होतात.
आजाराची कारणे काय ?
फास्ट फूडचे वाढलेले सेवन, आरोग्यदायी फळे आणि भाज्यांचे कमी सेवन, आरोग्यदायी आहाराचा अभाव, बैठी जीवनशैली