Health News : एखादया रुग्णाला हृदयविकाराचा झटका असल्याची खात्री पटल्यास आपले दोन्ही हात बोटांमध्ये अडकवून १०० ते १२० वेळा छाती जोरजोरात दाबावी. सदरचे पंपिंग तीन मिनिटाचे आत करावे,
नंतर अॅम्बुलन्सला फोन करून उपचारासाठी रुग्णाला रुग्णालयात पाठवावे, अशा रुग्णाची नक्कीच प्राण वाचतील. तेव्हा हृदयविकाराचा झटका आल्यास प्रथमोपचार म्हणून छाती जोरजोरात दाबून रुग्णाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन हृदयरोग तज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ यांनी केले.
जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त ‘हार्ट अटॅक वरील प्रथमोपचार’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणात डॉ. शिरसाठ रेडक्रॉस सोसायटी सभासदांना आगाशे सभागृहात प्रशिक्षण देतांना बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ. शिरसाठ म्हणाले, दम लागणे, थकवा येणे, डावा अथवा उजवा हात दुखणे यासारखी लक्षणे असल्यास ताबडतोब ईसीजी काढावा. त्यामुळे प्राथमिक निदान होऊ शकते. याकडे कुणीही दुर्लक्ष करू नये. यातून मोठा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वेळीच दवाखान्यात जाऊन तपासण्या करणे गरजेचे आहे. मधुमेह व रक्तदाब (ब्लड प्रेशर) असणाऱ्या रुग्णांनी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे.
नियंत्रित वजन व आहार, आनंदी वृत्ती, सकारात्मक ऊर्जा, व्यायाम यासारख्या साधनांनी वरील आजारावर मात करू शकतो. यावेळी भरत कंकलोळ, प्रा. सुप्रिया साळवे, पुष्पा शिंदे, शोभा शेंडगे, सविता साळुंके, सुरंजन साळवे आदींनी विचारलेल्या विविध शंकांचे डॉ. शिरसाठ यांनी समाधान केले. डॉक्टर संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांनी रेड क्रॉस सोसायटीच्या उपक्रमाचे कौतुक केले. रेड क्रॉस अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात झाला.
या प्रशिक्षणामध्ये सुनिल साळवे, भरत कुंकूलोळ, केशव धायगुडे, साहेबराव रकटे, नानासाहेब मुठे, कांतीलाल शिंदे, सोपान नन्नवरे, किरण सोनवणे, सुरेश वाघुले, सुधाकर पिलगर, ब्रदर शेख, समद शेख, दिलावर पठाण, प्रविण साळवे, प्रकाश मेतकर, श्रावण भोसले, विश्वास भोसले, राजेंद्र केदारी, बाळासाहेब पाटोळे भाऊसाहेब कवडे, ज्ञानदेव माळी, संदीप छाजेड, डॉ. स्वप्निल पुरनाळे, किशोर सोसे, पुष्पाताई शिंदे, शोभा शेंडगे, सविता साळुंके, निर्मला लांडगे, स्वाती पुरे, प्रा. सुप्रिया साळवे, प्रा. दिपाली ठाणगे, श्वेता साळवे आदींनी सहभाग घेतला.