आरोग्य

प्रदूषणाने सर्वच बेजार ! सर्दीसह होतायेत अनेक आजार, गूळ खा अन यातून मुक्त व्हा..जाणून घ्या गुळातील अँटीपॉल्यूशन गुणधर्म

Health News : सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. ऋतू बदलला की अनेकांना सर्दीसारखे आजारही होतात. अनेक लोक सर्दीपासून वाचण्यासाठी अनेक उपाय करतात. शरीर उबदार ठेवण्यासाठी विविध प्रकारचे कपडे देखील वापरतात.

परंतु आपण आपल्या आहारातून ज्या पद्धतीने जे पदार्थ घेऊ ते जर व्यवस्थित घेतले तर शरीर तंदुरुस्त राहते. या हिवाळ्यात जर तुम्हाला सर्दीपासून दूर राहायचे असेल तर गूळ हा महत्वाचा ठरेल. परंतु सध्या सर्दी होण्याचं किंवा आजार होण्याचं वेगळंच कारण समोर येतंय.

ते म्हणजे वाढलेलं प्रदूषण. या प्रदूषणाच्या आजारात गूळ शरीराला कसा फायदेशीर आहे ? त्याचे आरोग्याला काय फायदे आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात –

गुळात एक प्रकारचा नैसर्गिक गोडवा असतो. यामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात. यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे गुणधर्म आपल्याला प्रदूषणामुळे शरीरास होणारे नुकसान टाळण्यास खूप मदत करतात. चला जाणून घेऊयात गूळ शरीराला प्रदूषण विरोधात कसा वाचवतो..

* श्वसनाच्या समस्या

गूळ शरीरातील विषारी आणि प्रदूषक घटक काढून टाकण्यास मदत करत असल्याने प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता गुळाने फार कमी होते.

* श्वसनमार्गाची सफाई

गुळाचे नैसर्गिक गुणधर्म नैसर्गिकरित्या श्वसनमार्ग स्वच्छ करण्यास मदत करतात. प्रदूषित हवेतील कणांमुळे होणाऱ्या गंभीर नुकसानापासून फुफ्फुसांचे संरक्षण गुळामुळे होते.

* प्रतिकारशक्ती

हिवाळ्यात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अर्थात इम्युनिटी कमी होते. याने लोक सहज संक्रमणास बळी पडतात. अशा परिस्थितीत या ऋतूत तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गूळ उपयुक्त ठरेल.

* विविध आजारांपासून संरक्षण

गूळ नियमितपणे खाल्ल्यास प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांशी लढण्याची शरीराची क्षमता सुधारण्यास मदत होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Health News

Recent Posts