आरोग्य

Bone Health Tips: चपाती कशाला खातात त्या ऐवजी खा ‘या’ भाकरी! हाडे राहतील मजबूत आणि दणकट, वाचा संपूर्ण माहिती

Bone Health Tips:- सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार खूप गरजेचा आहे. त्यासोबतच तुमचा दैनंदिन रुटीन कसा आहे याचा देखील खूप मोठा प्रभाव हा तुमचा शारीरिक आरोग्यावर होत असतो. सध्याची जीवनशैली पाहिली तर अत्यंत धावपळ आणि ताणतणावाची झाली असल्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात.

त्यामुळे त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होताना दिसतो व दैनंदिन कामे देखील आपण व्यवस्थित करू शकत नाहीत. आयुष्यामध्ये जर आनंदित जीवन जगायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुमचे शारीरिक आरोग्य उत्तम असणे खूप गरजेचे आहे.

तुम्हाला जर तुमचे आरोग्य सुदृढ आणि दुरुस्त ठेवायचे असेल तर तुम्हाला संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे. साधारणपणे आपण आहारामध्ये भाजी पोळी, डाळ भात आणि वेगवेगळ्या पिठाच्या भाकरीचा समावेश करत असतो. यामध्ये जर आपण नाचणी आणि बाजरी सारखे तृणधान्य पाहिले तर नाचणी आणि बाजरीच्या पिठाच्या भाकरी या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. खास हाडांच्या मजबुतीच्या दृष्टिकोनातून या पिठाच्या भाकरी म्हणजे वरदानच आहेत.

 बाजरी नाचणीच्या भाकरीचे आरोग्यदायी फायदे

1- बाजरी आणि नाचणीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असून यामध्ये असलेले प्रोटीन, कॅल्शियम आणि जीवनसत्वे इत्यादी पोषक घटकांमुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत होत असते.

2-

बाजरी आणि नाचणीच्या पिठाच्या भाकरी जर खाल्ल्या तर हाडांच्या मजबुतीच्या दृष्टिकोनातून ते खूप फायद्याचे ठरते.वयोवृद्ध व्यक्तीने जर नाचणी आणि बाजरीच्या पिठाची भाकर खाल्ली तर खूप मोठा फायदा होतो तसेच सांधेदुखीला देखील खूप मोठ्या प्रमाणावर आराम मिळण्यास मदत होते.

3- बाजरी आणि नाचणीच्या पिठाची भाकर ही संधिवात असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असून या भाकरीमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे पित्तामुळे जी काही जळजळ होते ती देखील कमी होण्यास मदत होते.

4- यामध्ये बाजरीचा विचार केला तर बाजरीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम हे घटक मोठ्या प्रमाणावर असतात व हाडांसाठी हे घटक महत्वाचे असल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी बाजरीची भाकर फायदेशीर ठरते. त्यामुळे जर हाडांच्या काही समस्या असतील तर नाचणी आणि बाजरीच्या पिठाच्या भाकरी यांचा आहारामध्ये समावेश करणे खूप गरजेचे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts