Health News : साध्याच जग धावपळीचं जग बनलं आहे. धकाधकीच्या जीवनात आरॊग्याकडे लक्ष देणं शक्य होत नाही. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो व अनेक व्याधी मागे लागतात. त्यामुळे आता या धकाधकीच्या जीवनात स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणं खूप गरजेचं झालं आहे.
त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या खाद्यपदार्थाचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. तसेच जंक फूड आणि फास्ट फूड खाणे टाळावे आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण आहार घ्यावा.
अशा स्थितीमध्ये खजूर स्वत:ला ऊर्जावान आणि तणावमुक्त ठेवण्यास मदत करते. खजूरमध्ये प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅलरी, कार्ब्स, फायबर, कॉपर, जीवनसत्त्वे आणि लोह यासारखे रासायनिक तत्व असतात जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात.
मजबूत पचनशक्ती
खजुरचे सेवन केल्याने पचनशक्ती मजबूत होते. यामध्ये आढळणारे फायबर तुम्हाला अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त करते. पचनशक्ती मजबूत करण्यासाठी रात्री चार खजूर भिजवून ठेवाव्यात व त्या सकाळी खाव्यात.
मधुमेहात फायदेशीर
खजुराचे नियमित सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. यात आढळणारे फायबर मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते. खजूर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते.
हाडांसाठी फायदेशीर
खजुरीमध्ये कॅल्शियम, कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने हाडे मजबूत राहतात.
जलद ऊर्जा भेटते
फळांमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज भरपूर प्रमाणात असतात. जे तुम्हाला झटपट ताकद देण्यासाठी फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
अॅलर्जीमध्ये फायदेशीर
खजुराचे नियमित सेवन केल्याने शरीरातील अॅलर्जी दूर होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे अॅलर्जीमुळे वाहणारे नाक आणि डोळे लाल होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
त्याचबरोबर त्वचेशी संबंधित समस्याही कमी होतात. तसेच तणावमुक्त राहण्यास मदत होते. अशा पद्धतीने या धकाधकीच्या जीवनात खजुरीचा आहारात समावेश करावा जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहाल व एनर्जी मिळेल.