आरोग्य

Diabetes : रक्तातील साखर वाढण्यामागे फक्त आहारच कारणीभूत नाही, तुमच्या ‘या’ नकळत होणाऱ्या चुका जाणून घ्या…

Diabetes : देशातच नव्हे तर जगात लोकांमध्ये सर्वात मोठी समस्या ही मधुमेहाची आहे. या आजराने देशातील लाखो लोक त्रस्त आहेत. अशा वेळी तुम्हालाही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही ही बातमी नीट वाचा.

कारण अनेकवेळा असेल होते ही तुम्ही या आजारात असताना तुम्हाला अनेकजण आहाराकडे लक्ष दे असे सांगतात. कारण मधुमेह आजार आणि त्यावर योग्य आहार घेणे ही सांगड घालणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही मधुमेह नियंत्रणात आणू शकता.

मात्र प्रत्येक वेळी या आजाराला आहारच जबाबदार असेल असे नाही. कारण मधुमेह असणारा व्यक्ती आहाराव्यतिरिक्त अशा अनेक चुका करत असतो ज्यामुळे तुमचा हा त्रास अधिक वाढत असतो.

तसे पाहिले तर मधुमेह हा एक जुनाट आजार आहे जो मुळापासून नष्ट केला जाऊ शकत नाही परंतु जीवनशैलीत बदल करून नियंत्रणात ठेवता येतो. जेव्हा स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही तेव्हा मधुमेहाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास केवळ आहारच कारणीभूत नसून त्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया-

या गोष्टींचा रक्तातील साखरेवर वाईट परिणाम होतो

झोप

झोप किती महत्वाची असते हे तर तुम्हाला माहित असेलच. अशा वेळी झोपेची ही योग्य वेळ असावी. झोपेचे चक्र तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तसेच अनेक शारीरिक प्रक्रियांवर परिणाम करत असते.

अभ्यासानुसार, झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ग्लुकोज नियंत्रण आणि इन्सुलिनच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला तणावाचाही सामना करावा लागू शकतो, ज्याचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत किमान 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

ताणतणाव

ताणतणाव हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. तणाव तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यामुळे तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. तणावामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप वाईट परिणाम होतो. तणावामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसोल हार्मोन तयार होतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

शारीरिक हालचालींची पातळी

व्यायाम करणे हे प्रत्येकाच्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही शारीरिक हालचाली केल्या नाहीत तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. असे घडते कारण नियमित व्यायामाने तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकता.

पण मधुमेहामध्ये व्यायाम करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मधुमेहामध्ये तज्ज्ञाशिवाय जड व्यायाम केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही अचानक कमी होऊ शकते.

डिहायड्रेशन

कमी पाणी पिणे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीसाठी हानिकारक असू शकते. जेव्हा तुम्ही कमी पाणी पितात, तेव्हा तुमच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते, ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. अधिक पाणी पिणे हे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे.

औषधोपचार

अनेक वेळा औषध घेणे हे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. कारण काहीवेळा औषधांचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवरही वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी कोणतेही औषध घेण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts