अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Health news :- आजकालच्या जीवनशैलीत सर्वसामान्य आजारांपैकी मधुमेही एक समस्या आहे. अशुद्ध आहार संतुलन यामुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होत आहे.
यामुळे रोजचारोज उत्तम व्यायाम करणे, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर चांगला आहार घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. यासाठी आहारात पुढील गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
राजमा खाणे फायद्याचे ठरते. राजमा हा फायबरचा समृद्ध स्रोत आहे आणि त्यात ग्लायसेमिकचे प्रमाण कमी देखील आहे,जे रक्तातील ग्लुकोज पातळी नियंत्रित करते.
राजमा हे बर्निंग कार्बोहायड्रेट आहे, जे रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही.तसेच राजमा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचीही पातळी कमी होते आणि इन्सुलिन सुधारते. अशाप्रकारे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.
राजमाचा आहारात अशाप्रकारे समावेश करावा. विविध भाज्या बनवून खाल्ल्याने तुम्हाला अँटी-ऑक्सिडेंट्स मिळतात आणि शरीर डिटॉक्सिफाय होते. राजमा कर्करोग प्रतिबंधित करते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, हाडे मजबूत करते आणि ते तुमच्या त्वचेसाठी चांगले असते.
जलद वजन कमी करण्यासाठी,आहारात साखर आणि चरबी कमी असलेले तपकिरी तांदूळ खावेत.
अन्नाच्या योग्यतेसाठी, तुम्ही आहारात बीन्स आणि तांदूळ समान प्रमाणात ठेवावे, जेणेकरुन तुमच्या अन्नाचा GI कमी असेल आणि शरीरात फुगल्यासारखे वाटत नाही. राजमा खाण्यापूर्वी चांगला शिजवून घ्यावा,अन्यथा कच्चे किंवा कमी शिजवलेले असल्यास ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात.