Diabetes : सध्याच्या काळात मधुमेह हा आजार खूप सामान्य झाला आहे आणि याला कारणीभूत आहे तो त्या व्यक्तीचा दिनक्रम, त्याची बदलती जीवनशैली आणि त्याचा डाएट. मधुमेह हा जरी सामान्य आजार असला तरी तो खूप घातक आजार आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर ते जीवावर बेतू शकते.
तसेच यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. अनेकजण अनेक उपाय करूनही त्यांचा मधुमेह नियंत्रणात येत नाही. जर तुम्हालाही अशी समस्या येत असेल तर काळजी करू नका. तुम्ही आता यावर घरगुती पद्धतीने उपाय करू शकता. कसे ते जाणून घ्या.
गुळवेळाचे फायदे
खरं तर, गुळवेळामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याने ते ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासोबत जळजळ कमी करते. इतकेच नाही तर त्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. गुळवेळ हे चवीला तुरट असते. परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुळवेळ खूप फायदेशीर मानला जातो. तसेच त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी गुळवेळाची पाने खूप फायदेशीर ठरतात.
अशाप्रकारे करा सेवन
गुळवेळाचा सेवन करण्याचा सर्वात सोपा आणि साधा मार्ग म्हणजे त्याच्या पानांचा एक डिकोक्शन बनवून ते रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. यासाठी चहाच्या पातेल्यात 250 मिली पाणी आणि 4-5 गुळवेळ पाने टाका. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. यानंतर गॅस बंद करून पाणी फिल्टर करा आणि ग्लासमध्ये काढा.
तसेच, आरोग्य किंवा आयुर्वेदिक तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला गुळवेळाच्या गोळ्या किंवा कॅप्सूल घेता येते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासही खूप मदत होते.