आरोग्य

Diabetic Patient : तुमचेही सतत डोकं दुखतंय? त्यामागे असू शकतील ‘ही’ कारणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Diabetic Patient : मधुमेहालाच सायलेंट किलर असेही म्हणतात. हा एक गंभीर आणि वेगाने वाढत जाणारा आजार आहे. चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नये. रक्तातील साखरेच्या अतिरिक्त प्रमाणाशी निगडित हा आजार आहे. याचा मोठा फटका शरीराच्या सर्वच कार्यांवर होतो.

डॉक्टरांच्या मतानुसार मधुमेहाचा धोका दर्शवणारे संकेत ओळखून तुम्हाला मधुमेहाचा धोका वेळेपूर्वीच टाळता येऊ शकतो. परंतु कधी कधी ही लक्षणे इतकी साधी असतात जी लवकरात लवकर ओळखू येत नाही.

डोकेदुखी

हायपोग्लाइसेमिया किंवा हायपरग्लायसेमियामुळे सततची होत असणारी डोकेदुखी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून उपचार करता येतो. तसेच, हे लक्षात घ्या की ज्या लोकांचे वारंवार डोके दुखते त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण डोकेदुखी इतर कारणांमुळे होते जसे की खराब दृष्टी, चिंता, तणाव, मायग्रेन, सायनस इ. त्यामुळे तुम्ही रक्तातील साखरेची पातळी सतत निरीक्षण करावे.

रक्तातील साखर

एका अहवालानुसार सकाळी 99 mg/dL किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात मोजली जाणारी रक्तातील साखर सामान्य आहे, तर 100 ते 125 mg/dL तुम्हाला प्रीडायबेटिस आहे असे सूचित करते. तसेच 126 mg/dL किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला मधुमेह असे लक्षात येते.

ही आहेत मधुमेहाची लक्षणे

सततची वाढलेली तहान, गोंधळ, वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, भूक न लागणे तसेच अस्पष्ट दृष्टी आणि दीर्घकाळ जखम भरणे ही मधुमेहाची सामान्य लक्षणे आहेत. तसेच मधुमेहावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर इतर आजारांचा धोका वाढत जातो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts