Disadvantages Of Eating Biscuits With Tea : देशात सर्वात जास्त पिले जाणारे ड्रिंक हे चहा आहे. चहाशिवाय अनेकांचा दिवस अपुरा आहे. लोकांना चहाची तलप अशी असते की चहा पिण्यासाठी ते काहीही करू शकतात.
अशा वेळी अनेकांना रोज सकाळी चहा पिणे आवडत असते. लोक रोज सकाळी चहा तर पितातच यासोबत बिस्किटे देखील खात असतात. मात्र तुम्हाला कदाचित माहित नसेल की चहा सोबत बिस्किटे खाल्य्याने काय होते?
जर तुम्हीही चहा आणि बिस्किटे खाण्याचे चाहते असाल तर तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. कारण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सरकारी बैठकांमध्ये चहासोबत बिस्किटे न देण्याची मागणी केली आहे. यामागे नेमके काय कारण असू शकते हे तुम्हीही जाणून घ्या.
तज्ज्ञ असे सांगतात की जास्त बिस्किट खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते. कारण यामध्ये रिफाइंड मैदा आणि हायड्रोजन फॅट्सचा वापर बिस्किटे बनवण्यासाठी केला जातो, जे वजन आणि लठ्ठपणा वाढवण्याचे काम करतात.
चहासोबत बिस्किटे खाण्याचे 4 मोठे नुकसान जाणून घ्या…
मधुमेह आजार वाढतो
जगात सर्वात जास्त हे मधुमेहाचे रुग्ण आहेत. अशा वेळी डॉक्टरही या रुग्णांना अनेक पदार्थांपासून लांब ठेवतात. यातील एक म्हणजे बिस्किट आहे. यामध्ये शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी इमल्सीफायर्स, प्रिझर्व्हेटिव्ह आणि कलरिंग सारखी रसायने असतात.
तसेच, त्यात मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी पुरेसे असते. अशा परिस्थितीत चहा किंवा कॉफीमध्ये बिस्किट घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि रक्तवाहिन्यांमध्ये इन्सुलिनचा दाबही वाढू शकतो. त्यामुळे या रुग्णांनी बिस्किटे आणि चहाला रामराम करावा.
सुरकुत्या
सहसा चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची अनेक कारणे असू शकतात. यातीलच एक मोठे कारण म्हणजे चहा आणि बिस्किटांचे मिश्रण. कारण बिस्किटांमध्ये आढळणाऱ्या रिफाइंड साखरमध्ये कोणतेही पौष्टिक घटक नसतात. त्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या दिसू लागतात. यासाठी चरबीयुक्त गोष्टींचा वापर करावा.
वजन वाढणे
लोकांना करायचे असतेच मात्र आहाराचे चुकीचे नियंत्रण यामुळे तुमचे वजन कधीच कमी होत नाही. तसेच तुम्ही बिस्किट खात असाल तर तुम्ही वजन कमी करण्याचा विचारही करू नका.
कारण बिस्किटांमध्ये उच्च कॅलरीज आणि हायड्रोजनेटेड फॅट जास्त प्रमाणात आढळते, जे लठ्ठपणा वाढवण्यासाठी पुरेसे आहे. साध्या बिस्किटात सरासरी 40 कॅलरीज असतात. त्याच वेळी, क्रीम किंवा ताजे बेक केलेल्या बिस्किटांमध्ये 100-150 कॅलरीज आहेत. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते.
दातांवर वाईट परिणाम
चहा आणि बिस्किट या दोन्हीमध्ये असलेले सुक्रोज तुमच्या दातांचे नुकसान करू शकतात. याच्या सेवनामुळे दात लवकर पडणे, दातांना छिद्र पडणे, तोंडात बॅक्टेरिया येणे यासह अनेक आजार होतात. त्यामुळे दातांमध्ये दुखणे, दातांचा रंग खराब होणे, त्यावर डाग पडणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.