Heart Attack Care : हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसताच ह्या गोष्टी करा ! रुग्णाचा जीव वाचेल…

Ahmednagarlive24 office
Published:
Heart Attack Care

Heart Attack Care : आपण बऱ्याचदा ऐकतो की एखाद्याच्या छातीत दुखत होते आणि पुढच्या काही तासातच त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटकादेखील आला. काही दुर्दैवी प्रकरणांमध्ये छातीत दुखणे सुरू होताच, अवघ्या काही मिनिटांतच मृत्यू ओढावतो.

यापैकी बहुतेक रुग्णांमध्ये ‘गोल्डन अवर’ मिळतात आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचवणे शक्य होते. अचानक छातीत तीव्र वेदना व्हायला सुरू झाल्या आणि हृदयविकाराच्या झटक्याची काही लक्षणे दिसताच तातडीने काय उपचार करावेत, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

शक्य तितक्या लवकर रुग्णवाहिका बोलवा. जवळच्या सुसज्ज आणि आधुनिक उपचार प्रणाली व यंत्रणा असलेल्या रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षाला भेट द्या. ईसीजी करून घ्या. ईसीजी एकतर सामान्य असेल किंवा एसटी एलिव्हेशन एमआय दर्शवेल किंवा उच्च जोखीम म्हणजेच अस्थिर एनजाइना दर्शवेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारातील रुग्णांना आपत्कालीन उपचारांची आवश्यकता आहे.

आपत्कालीन कक्षात असताना, कार्डियाक ट्रोपोनिन आय, डी डीमर आणि एनटी प्रो बीएनपीसाठी रक्त नमुना घेतला जाईल. हे छातीतील वेदना दर्शवेल. इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टशी संपर्क साधा.

पूर्ण विकसित हृदयविकाराचा झटका ( एसटी एलिव्हेशन एमआय) असल्यास, कार्डिओलॉजिस्ट तत्काळ अँजिओप्लास्टी सुचवतील. अशावेळी संकोच बाळगू नका. ताबडतोब अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला द्या. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये तत्काळ अँजिओप्लास्टी (ज्याला ‘प्राथमिक अँजिओप्लास्टी’ देखील म्हणतात) हा जीव वाचवण्याचा सर्वात खात्रीचा आणि सुरक्षित मार्ग आहे. ताबडतोब अँजिओप्लास्टी केल्यास नक्कीच फायदा होतो.

३२५ मिलीग्राम डिस्प्रिन आणि क्लोपीडोग्रेलच्या ४ गोळ्या एकाच वेळी घ्या. हृदयविकाराचा धोका असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या सोबत बाळगावीत. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याचा उपयोग करावा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामध्ये सॉर्बिट्रेटचा उपयोग होत नाही आणि त्यामुळे बीपीमध्ये गंभीर घट होऊ शकते आणि त्यामुळे छातीत तीव्र वेदना होत असताना त्याचा वापर टाळणे योग्य राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe