आरोग्य

तुम्हाला माहिती आहे का काश्मीरी लसूणबद्दल? वजन कमी करण्यासाठी होतो त्याचा फायदा आणि काय आहे विशेषता?

Benefit Of Kashmiri Garlic:- लसूण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि दररोजच्या आहारामध्ये लसणाचा वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून लसणामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात व त्यामुळे लसणाचा वापर हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील फायद्याचा ठरतो.

परंतु या फायद्याच्या लसणाचा जर आपण एक प्रकार पाहिला तर तो खूप फायदेशीर असून वजन कमी करण्यासाठी देखील फायद्याचा समजला जातो. असे म्हटले जाते की आजकाल लोक हा लसूण ऑनलाईन विकत घेतात व त्याचा वापर करतात.

या लसणाला काश्मिरी लसूण असे नाव असून हिवाळ्यामध्ये त्याची मागणी वाढल्याचे दिसून येते. परंतु या मागील प्रमुख कारण काय? काश्मिरी लसूण सामान्य लसणापेक्षा किती वेगळा आहे? याच प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात या लेखात बघणार आहोत.

काश्मिरी लसूण म्हणजे नेमके काय?
काश्मिरी लसूण हा एक लसणाचाच प्रकार आहे व यामध्ये एन्सिलिनचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे त्याला एक तीक्ष्ण असा वास असतो. या लसणाला हिमालयीन लसुण असं देखील म्हणतात. साधारणपणे हिमालयीन प्रदेशांमध्ये आढळणारा हा लसणाचा विशेष प्रकार असून सामान्य लसणापेक्षा आकाराने हा खूप लहान असतो व काश्मीरमध्ये सर्वाधिक आढळून येतो.

काश्मिरी लसणाला लसणाच्या शुद्ध वानांपैकी एक मानले जाते आणि तो दुर्मिळ आहे. जर सामान्य लसूण आणि काश्मिरी लसुन या दोघांमधील फरक जर पाहिला तर काश्मिरी लसणाची एक पाकळी सामान्य लसणाच्या पाकळीच्या तुलनेत सात पट अधिक पावरफुल असते

व यामागील प्रमुख कारण म्हणजे काश्मिरी लसणामध्ये असलेले एन्सिलिनचे प्रमाण होय व हे प्रमाण जास्त असते. काश्मिरी लसणाच्या दोन पाकळ्या देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर समजल्या जातात.

वजन कमी करण्यासाठी होतो काश्मिरी लसणाचा फायदा
वजन कमी करण्याकरिता काश्मिरी लसूण खूप फायदेशीर समजला जातो. हा लसूण सगळ्यात अगोदर चरबीचे चयापचय वेगवान करू शकतो आणि नंतर ते जलद वजन कमी करण्यास मदत करते.

शरीरातील चरबी आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील हा लसूण उपयुक्त आहे. काश्मिरी लसणामुळे चरबीची पातळी कमी होते व यानंतर स्टॅमिना बूस्टर सारखे हा लसुन काम करतो आणि व्यायामाचा वेळ वाढवण्यास देखील हा उपयुक्त आहे.

काश्मिरी लसणाचा वापर कसा करावा?
याकरिता सकाळी रिकाम्या पोटी दोन पाकळ्या खाव्यात. तसेच हा लसूण सोलून चावून खा. काश्मिरी लसूण खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या व त्यानंतर त्याचा वास आणि तिखट चवी पासून आराम मिळण्यासाठी लगेच एक ग्लास थंड पाणी प्या. तुम्ही हा लसूण सूपमध्ये घालून देखील खाऊ शकतात. जे व्यायामासाठी स्टॅमिना वाढवण्यास मदत करते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts