Health News : मूळव्याध हा एक असा आजार आहे जो खूप वेदनादायक आहे. या आजारास रूट डिसऑर्डर असेही म्हणतात. हे होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक कोमट पाणी पितात.
पण कितपत योग्य आहे? त्याचा किती परिणाम होतो ? चला याबद्दल जाणून घेऊव्यात – जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर सर्वप्रथम आपल्या आहारात पचनसंस्थेसाठी फायदेशीर पदार्थांचा समावेश करावा.
मूळव्याध असलेल्या रुग्णांना बद्धकोष्ठता, अपचन, अॅसिडिटी आणि पोटदुखी सारख्या समस्या देखील होऊ शकतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी रुग्ण गरम किंवा कोमट पाणी पितात.
सर्वप्रथम जाणून घेऊया मूळव्याधी आजारात कोमट पाणी पिण्याचे फायदे. खरं तर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि या विकारांपासून मुक्तहोण्यासाठी कोमट पाणी खूप फायदेशीर ठरू शकतं. कोमट पाणी बद्धकोष्ठतेमध्ये आतड्यांसंबंधी हालचाल सुलभ करेल, ज्यामुळे मूळव्याधांमध्ये देखील आराम मिळू शकतो.
तुम्ही ते दोन प्रकारे पिऊ शकता. एकतर तुम्ही एका ग्लासमध्ये साधे कोमट पाणी पिऊ शकता किंवा त्यात थोडे लिंबू आणि हळद टाकून ते पिऊ शकता. याशिवाय कोमट पाण्यात बसने मूळव्याधमध्ये खूप प्रभावी मानले जाते. डॉक्टर अनेकदा याची शिफारस करतात.
औषधांसोबतच कोमट पाण्यात बसल्यानेही मूळव्याध बरा होण्यास मदत होते. बाथटबमध्ये कोमट पाणी टाकून त्यात अर्धा कप एप्पल साइडर व्हिनेगर घालून सीट्स बाथसाठी पाणी तयार करावे. आता गुदद्वार टबमध्ये 10 ते 20 मिनिटे ठेवा.
कोमट पाण्यामुळे मलाशय परिसरातील स्नायूंना आराम मिळतो, खाज येत नाही. एप्पल साइडर व्हिनेगरमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जीवाणूंमुळे होणारा लालसरपणा आणि वेदना दूर होतात आणि सूज कमी होण्यास देखील मदत होते.