Mint water benefits : उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे शरीरात उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. आता ऑक्टोबर हिट सुरु होईल. उष्णतेची ही समस्या टाळण्यासाठी भरपूर लिक्विड पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो.
परंतु तहान भागवण्यासाठी पाणी पुरेसे असते, पण शरीराच्या इतर गरजांसाठी पाणी पुरेसे ठरत नाही. त्यामुळे कडक उन्हात शरीर थंड ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत त्या फॉलो करा
–आज आम्ही तुम्हाला पुदिन्याचे पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत. पुदिन्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. पुदिन्याच्या पानातील कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, डी, ई आणि बी कॉम्प्लेक्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. चला त्याचे शरीरासाठीचे फायदे जाणून घेऊयात –
1. पोट निरोगी ठेवते
पुदिन्यामध्ये मेन्थॉल असते. त्याने पचनसंस्था सुधारते. आपले पोट निरोगी ठेवते. याचे सेवन केल्याने पोट नेहमी थंड राहते, त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात बहुतांश लोकांना पोटात जळजळ होते, त्यामुळे पुदिन्याच्या पानांचे पाणी प्यावे.
2. डोकेदुखीपासून आराम मिळतो
जर तुम्हाला उन्हाळ्यात डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे ही समस्या वाढू शकते. पुदिन्याचा तीव्र सुगंध आणि चव डोकेदुखी कमी करण्यास मदत करते.
3. आळस दूर होईल
उन्हाळ्यात उष्णतेमुळे अनेकदा लोकांना आळस आणि झोप येते, पुदिना मेंदूला सतर्क ठेवण्यास मदत करतो आणि झोप दूर करतो.
4. त्वचा निरोगी ठेवते
पुदिन्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे उन्हाळ्यात आपली त्वचा ताजी आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. तेलकट त्वचेमुळे होणारी समस्या दूर करते. अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पुदिना पिंपल्सपासून मुक्त होण्यास मदत करतो.