आरोग्य

काय म्हणता! कुत्रा पाळल्यामुळे आरोग्याला मिळतात फायदे! हे आजार राहतात दूर, वाचा माहिती

मनुष्याला अनेक प्राणी पाळण्याची फार पूर्वापार सवय आहे. शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकरी गाय, म्हशी तसेच बैल इत्यादी पाळीव प्राणी पाळतात व अशा प्राण्यांशी खूप माणुसकी आणि आपलेपणाचे भावना शेतकऱ्यांमध्ये असते. असे प्राणी शेतकऱ्यांना त्यांच्या घरातील कौटुंबिक सदस्य प्रमाणेच वाटतात.

यासोबतच अनेक जण मग ते शहरी भागातील असो किंवा ग्रामीण भागातील व्यक्ती यातील बऱ्याच जणांना  कुत्रा पाळण्याचा छंद असतो आणि विशेष म्हणजे कुत्रा हा खूप प्रामाणिक असा प्राणी समजला जातो. कुटुंबाच्या सदस्याप्रमाणेच कुत्रा हा घरात वावरत असतो. घराचे संरक्षण करणे हे कुत्र्याचे प्रमुख काम समजले जाते.

परंतु या व्यतिरिक्त जर तुम्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कुत्रा पाळण्याचे खूप फायदे होतात नाहीतर तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे. कुत्रा पाळल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात व या विषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

 कुत्रा पाळल्यामुळे मिळतात हे आरोग्यदायी फायदे

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, हावर्ड मेडिकल स्कूलने एका संशोधनाचा दाखला देत म्हटले आहे की कुत्रा पाळल्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. यामुळे मालकाला उच्च रक्तदाब तसेच हाय कोलेस्ट्रॉल आणि हृदय रोगाचा धोका कमीत कमी होतो एवढेच नाही तर मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील कुत्रा पाळणे फायद्याचे ठरते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर….

1- हृदयासाठी उत्तम पाळीव कुत्रा हा हृदयासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो कारण भरपूर संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की कुत्रा पाळणाऱ्यांचे कोलेस्ट्रॉल तसेच हाय ब्लड प्रेशर सारखे आजार नियंत्रणात राहतात.

2- एकटेपणा नाहीसा होतो सध्याच्या काळात भरपूर कारणांमुळे किंवा दैनंदिन जीवनशैलीमुळे अनेक व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातात व हीच फार मोठी समस्या आहे. यामध्ये जर एकटेपणा असेल तर व्यक्तीचे मन उदास होते व डिप्रेशन सारखे समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. परंतु तुमच्याकडे जर कुत्रा असेल तर तुमचा एकटेपणा नष्ट करण्यास त्यामुळे मदत होते. कुत्रा जर सोबत राहिला तर तुम्हाला एकटेपणा कधीच जाणवणार नाही.

3- तणावाची परिस्थिती कमी होण्यास मदत बऱ्याचदा कामाची दगदग आणि जबाबदारी यामुळे ताण-तणाव येतो व यामुळे ब्लड प्रेशर तसेच दम लागणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. अशाप्रसंगी जर तुम्ही घरातील पाळलेल्या कुत्र्याला दहा मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ थोपटत राहिले तर तुम्हाला वरील सर्व लक्षणांपासून त्वरित आराम मिळू शकतो.

4- फिटनेस ठेवण्यासाठी उत्तम सध्या अनेक वर्क फ्रॉम होम कामांमध्ये किंवा ऑफिस मध्ये बसून काम असल्यामुळे शरीराच्या हालचाल खूप कमी प्रमाणात होते व त्यामुळे लठ्ठपणा तसेच वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. परंतु तुमच्या घरामध्ये जर पाळीव कुत्रा असेल तर यामुळे तुमची शारीरिक हालचाल वाढू शकते. कुत्र्याला जर तुम्ही बाहेर फिरायला नेले तर तुम्हाला त्यासोबत चालावे लागते त्यासोबत पळावे लागते व त्यामुळे तुमच्या शरीराची हालचाल कायम होते व त्याचा उपयोग हा तुमच्या शरीराच्या फिटनेससाठी होतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts