Hair Care Tips : इतरांसारखे आपलेही केस कंबरेपर्यंत लांब असावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. लांब, घनदाट आणि चमकदार केसांसाठी त्या अनेक उपाय करतात. परंतु अनेक स्त्रियांनी कितीही उपाय केले तर त्यांना पाहिजे तसे केस मिळत नाहीत.
जर तुम्हालाही अशी समस्या येत असेल तर तुम्ही आता त्यावर उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या एक हेअर मास्क बनवू शकता. जर तुम्ही तो नियमित लावला तर तुमचेही केस महिन्याभरातच कंबरेपेक्षा लांब आणि घनदाट होतील. कसे ते जाणून घ्या.
असा बनवा हेअर मास्क
- जर तुम्हाला बीटरूट आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 10 ते 12 कढीपत्ता, 1 छोटा बीटरूट आणि एक चमचा खोबरेल तेल गरजेचे असणार आहे.
- सर्वात अगोदर बीटरूट आणि कढीपत्ता धुतल्यानंतर त्यांचे लहान-लहान तुकडे करून घ्या.
- त्यानंतर आता बीटरूट आणि कढीपत्त्याची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्या. तयार करण्यात आलेल्या पेस्टमध्ये खोबरेल तेल घालावे.
- ही पेस्ट चांगली मिसळून त्यानंतर टाळूची चांगली मालिश करावी. एकूण अर्धा तास मसाज केल्यानंतर तुमचे डोके थंड पाणी आणि शॅम्पूने धुवून घ्या.
- याचा जर तुम्ही नियमित वापर केला तर तुमचे केस चमकदार होतील आणि केस मजबूत होतील.
- यातील कढीपत्ता हा केस मजबूत करण्यास मदत करेल तसेच बीटरूट तुमच्या केसांना पोषण देईल.
- इतकेच नाही तर खोबरेल तेल केसांना हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज ठेवेल.