आरोग्य

Hair Care Tips: डोक्यावर पांढरे केस दिसायला लागलेत? नका करू काळजी! हा उपाय करा केस होतील काळे

Hair Care Tips:- डोक्यावरचे केस पांढरे होणे ही समस्या आता अगदी कमीत कमी वय असलेल्या मुलांमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. तसेच जर आपण एकंदरीत वयाचा विचार केला तर साधारणतः बऱ्याच तरुण-तरुणींच्या डोक्यावरचे केस पंचवीशीनंतर देखील पांढरे दिसायला लागतात.

त्यामुळे हे पांढरे केस काळे करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. परंतु हवा तेवढा फायदा होताना दिसून येत नाही. त्यामुळे बरेच जण सरासपणे हेअर डायचा वापर करून केस काळे करतात. परंतु काल काही दिवसांनी परत केस पांढरे दिसायला लागतात व हे परत परत आपल्याला करायला लागते. या सगळ्या त्रासातून जर तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर तुम्ही डोक्याला लावत असलेले खोबरे तेल चा वापर करून पांढरे केस मुळासकट काळे करू शकतात.

 पांढरे केस होतील काळे

आपण जे नेहमी केसांना खोबरेल तेल किंवा नारळाचे तेल लावतो. या तेलातील नैसर्गिक गुणधर्म केसांच्या पोषणासाठी खूप गुणकारी असतात. याच नारळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही तुमचे पांढरे केस काळेशार करू शकतात. याकरिता तुम्हाला….

1- जर खूप कमी वयामध्ये तुमचे केस पांढरे दिसायला लागले असतील तर नारळाच्या तेलामध्ये ताजा आवळा चांगला उकळून घ्यावा व आवळ्याचा रंग बदल होईल तोपर्यंत त्याला चांगला शिजवावा.

त्यानंतर हे तेल जेव्हा थंड होईल तेव्हा रात्री तुम्ही जेव्हा झोपाल त्या अगोदर ते केसांना व्यवस्थित लावा. सकाळी उठल्यावर चांगले केस धुवून घ्या. या उपायाने केस काळे होण्यास मदत होते. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा हा उपाय केल्यास केस चांगले राहतात.

2- नारळाची अथवा खोबऱ्याचे तेल तुम्ही लावल्यानंतर केसांमध्ये जी काही कोंड्याची समस्या उद्भवते ती देखील उद्भवत नाही कारण या तेलामध्ये अँटीऑक्सिडेंट व अँटिमायक्रोबील घटक असतात व त्यामध्ये कॅल्शियम तसेच विटामिन सी यासारखे पोषक घटक असतात. यामुळे केस आतून खूप मजबूत बनतात व बाहेरून देखील त्यांच्यामध्ये विशेष चमक दिसते.

3- नारळाचे तेल आणि मेहंदीचा वापर पांढरे केस काळे करण्यासाठी नारळाचे तेल आणि मेहंदी हा एक चांगला उपाय आहे. मेहंदी रंग हा केसांच्या मुळापर्यंत पोहोचतो व केस काळेभोर दिसतात. याकरिता आवळा आणि मेहंदीची पावडर एकत्र करून घ्यावी व त्यामध्ये तीन ते चार चमचे नारळाचं तेल घालून ते चांगले उकळून घ्यावे.

यामध्ये मेहंदीची पाने घालावी व तेलाचा रंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्याला चांगले उकळून घ्यावे. त्यानंतर हे तेल व्यवस्थित थंड करून केसांच्या मुळाना लावावे. लावल्यानंतर 40 मिनिटे कमीत कमी केसांवर तसेच ठेवावे व नंतर केस धुवावे. ही क्रिया नियमित केली तर केस काळे होतात.

4- नारळाचे तेल आणि आवळा नारळाच्या तेलाचा व आवळ्याचा तुम्ही एकत्रितरित्या वापर केला तर केस काळे होण्यास चांगली मदत होते. यामध्ये तीन चमचे नारळाचे तेल घेऊन त्यात दोन चमचे आवळ्याची पावडर मिसळावी. नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यावे व गरम करावे व तेल थंड झाल्यानंतर केसांच्या मुळाना लावून व्यवस्थित केसांचा मसाज करावा व रात्रभर तसेच ठेवून सकाळी शाम्पूने व्यवस्थित केस धुवून घ्यावे. हा देखील उपाय केस काळे होण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts